Chhattisgarh 12 MLAs Suspension : छत्तीसगडमध्येही महाराष्ट्राची पुनरावृत्ती, भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसह 12 आमदार निलंबित
Chhattisgarh Vidhan Sabha Winter Session : छत्तीसगड विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार गोंधळ झाल्याचे समोर आले. ज्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Chhattisgarh 12 MLAs Suspension : छत्तीसगड विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Chhattisgarh Vidhan Sabha Winter Session) दुसऱ्या दिवशी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. प्रधानमंत्री आवास योजनेबाबतच्या (Pradhan Mantri Awas Yojana) प्रश्नावरुन हा वाद झाला. यावेळी बीजेपीच्या आमदारांनी प्रधानमंत्री आवास योजनेवरुन प्रश्न उपस्थित केले. या गोंधळानंतर बीजेपीच्या आमदारांनी तिथेच नारेबाजी करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांच्यासोबत 12 भाजपाच्या आमदारांना निलंबित केलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज बुधवारपर्यंत स्थगित करण्यात आलं.
प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा सर्वात आधी भाजपाचे आमदार अजय चंद्राकर यांनी उचलला. ज्यानंतर टीएस सिंहदेवने उत्तरात 2020-21 वर्षात केंद्र सरकारने 7 लाख 81 हजार 999 घरं तयार करण्याचं लक्ष्य ठरवलं होतं. ज्यातील 2 लाख 74 हजार घरं अजून तयार होणं बाकी आहे. केंद्राकडून 762 कोटी रुपये येणे बाकी असल्याचंही सिंहदेव यांनी सांगितलं. ज्याच्या उत्तरात भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ सुरु केला. ज्यानंतर 12 आमदाराचं निलंबन करण्यात आलं.
बीजेपीकडून विधानसभेकचं आंदोलन
विधानसभा परिसरात बीजेपी आमदारांनी आंदोलन सुरु केलं. कारण केंद्र सरकारवर निशाना साधत संसदीय कार्यमंत्री रविंद्र चौबे यांनी केंद्र सरकार 32 कोटी देणं बाकी असल्याचं सांगितलं. तसंच असं असूनही राज्यातील बीजेपीकडून केंद्र सरकारला पत्र लिहिलं जात नाही. ज्यानंतर माजी मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी छत्तीसगड विधानसभेवर बहिष्कार टाकण्यापेक्षा मोठी काय? असं सांगत सरकार नेमकं लक्ष्य देत नसून आंदोलंकानी रस्ते भरल्यानंतरही सरकार योग्य उपाययोजना करत नसल्याचं सिंह म्हणाले.
महाराष्ट्रातही 12 भाजप आमदार निलंबित
छत्तीसगडआधी महाराष्ट्रातही भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. जुलै महिन्यात झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन केलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्याने राज्यात मोठं राजकारण रंगलं. निलंबित आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, राम सातपुते यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे.
हे ही वाचा -
- Maharashtra 12 MLAs Suspension : भाजपला झटका, 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यासा सुप्रीम कोर्टाचा नकार
- शिवसेनेचा पराभव म्हणजे विश्वासाला तडा, विधानपरिषदेच्या निकालावर सावंतांची प्रतिक्रिया
- विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक नवीन नियमानुसार कशी असणार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha