'राज ठाकरेंना दिशा गवसत नाहीये', विजय वडेट्टीवारांची जोरदार टीका, म्हणाले, "मुख्य प्रश्नांना बगल देत माल खाण्यासाठी.."
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घटनांना वेग आला असून मराठा आरक्षणासह लाडकी बहिण योजना तसेच आंनंदाचा शिधावरून वडेट्टीवारांनी सरकारला चांगलंच सुनावलं आहे
ViJay Vadettiwar on Raj Thackeray: राज ठाकरे 'कन्फूज्यड' नेते आहेत. त्यांची भूमिका बघा, कधी मोदी विरुद्ध कधी बाजूने बोलतात. शरद पवार स्तुती, विरोध दोन्ही करतात. त्यांना दिशा गवसत नाहीये. उद्धव आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकमेकांवर काहीही फेकू नये, हे आपल्या संस्कृतीला पचणारे नाही. आपण हे खपवून घेऊ नये,असले प्रकार टाळावे. असे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी ही या वादात आता उडी घेतली, मुख्य प्रश्नांना बगल देऊन माल खाण्यासाठी हे सुरु असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीये.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घटनांना वेग आला असून मराठा आरक्षणासह लाडकी बहिण योजना तसेच आंनंदाचा शिधावरून वडेट्टीवारांनी सरकारला चांगलंच सुनावलं आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकारणीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
लोकसभेपासून राज ठाकरेंच्या तोंडून मोदींची भाषा येतेय
राज्यात मनसे आणि शिवसेनेत झालेल्या सुफारीफेकीनंतर राजकीय वातावरण गढूळ झाले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय.ते म्हणाले,' राज ठाकरे अतिशय कन्फ्यूज नेते आहेत. त्यांची भूमिका बघा, कधी मोदी विरुद्ध कधी बाजूने बोलतात शरद पवार स्तुती विरोध दोन्ही करतात त्यांना दिशा गवसत नाहीय... उद्धवजी आणि राज ठाकरे यांनी कुणी कुणावर काहीही फेकू नये आपल्या संस्कृती ला हे पचणारे नाही...आपण हे खपवून घेऊ नये,असले प्रकार टाळावे.'
मोदी ची भाषा त्यांच्या ( राज ठाकरेंच्या ) तोंडून लोकसभेपासून येतेय, धमकी देऊन जनतेकडून तुम्ही मत घेऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल असे त्यांनी वागावे अशी आमची त्यांना विनंती. असेही वडेट्टीवार म्हणाले.
'मराठा ओबीसीमध्ये सरकारने दरी निर्माण केली'
मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी तुमच्या हाताला लकवा मारलाय का? असा सवाल करत वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. आमच्या हातात काय आहे, ही सगळी बनवाबनवी सुरुय. ज्याची जेवढी संख्या तितके त्यांना आरक्षण हे राहुल गांधी म्हणाले आहे ती आमची भूमिका आहे, जनगणना करा. जरांगे पाटलांची मागणी कुणीही 100 टक्के पूर्ण करू शकत नाही, आरक्षणाचा तिढा सुटेल यात शंका नाही, जातनिहाय जनगणना करून त्या त्या समाजाला अधिकार देता येईल. अशी भूमिका वडेट्टीवारांनी मांडली.
लोकसभेत मतांची कडकी म्हणून आठवली बहीण लाडकी
विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर यांना लाडकी बहीण आठवली आहे असे वडेट्टीवार म्हणाले. लोकसभेत झाली मतांची कडकी म्हणून आता आठवली बहीण लाडकी.. महिला अत्याचार राज्यात वाढले आहे. आपण यूपीला मागे टाकले आहे, हे सगळं सोंग आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे देतील आणि नंतर वाऱ्यावर सोडून देतील अशी टीका वडेट्टीवारांनी सरकारवर केली.