एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव

Maharashtra Politics: शरद पवारांच्या बिछान्याशेजारी खुर्ची टाकून छगन भुजबळांची मराठा- ओबीसी आरक्षणावर चर्चा. शरद पवारांनी भुजबळांना काय शब्द दिला? आरक्षणाची समस्या तुम्हीच सोडवू शकता, भुजबळांकडून पवारांची मनधरणी

मुंबई: तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात. प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात समाज घटकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झालो म्हणजे आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे तुम्ही आरक्षणासंदर्भातील बैठकीला आले पाहिजे, अशा शब्दांत राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार (Chhagan Bhujbal) यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबईतील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत प्रसारमाध्यमांना सांगितला.

आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला तुम्ही यायला पाहिजे होते, असे मी त्यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी म्हटले की, आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी काय बोलले, त्यांना काय आश्वासनं दिली, हे आम्हाला माहिती नाही. तसेच तुम्ही लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण सोडवताना काय बोललात, याचीही आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला आलो नाही, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

त्यावर मी शरद पवार यांना आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेची माहिती दिली. माझे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी , 'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन, असे म्हटले. आम्ही दोनचार लोक एकत्रं बसू. आरक्षणाबाबत काय होतंय, काय केलं पाहिजे, यावर आम्ही चर्चा करु. मी आरक्षणाची समस्या सोडवायला तयार आहे. पण सध्या माझी तब्येत बरी नाही. पण दोन दिवसांत आपण यावर चर्चा करू, असा शब्द शरद पवार यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्यातील परिस्थिती स्फोटक, ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी तुमची, छगन भुजबळांचं पवारांना आवाहन

या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आरक्षण प्रश्नात लक्ष घालण्यासाठी वारंवार गळ घातली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. ओबीसी, धनगर, वंजारी हे मराठा समाजाच्या दुकानात जात नाहीत. महाराष्ट्रात अशी सगळी परिस्थितीत असताना एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, असे मी शरद पवारांना सांगितल्याचे भुजबळ यांनी म्हटले. 

मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देताना अशीच स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा सरकारचं काय होईल, ते होईल, पण हा निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका घेत, तुम्ही निर्णय रेटला. आजही तशीच परिस्थिती आहे, असे भुजबळ यांनी पवारांना सांगितले.

VIDEO: छगन भुजबळ आणि शरद पवारांची नेमकी काय चर्चा झाली?

आणखी वाचा

शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 08 PM 19 August 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगनाव आढावा एका क्लिकवर ABP MajhaPune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलतान्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
Embed widget