एक्स्प्लोर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत: जयंत पाटील

Jjayant Patil On Shinde-Fadnavis Govt: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Jjayant Patil On Shinde-Fadnavis Govt: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची  प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

मराठवाड्यातील सहा जिल्हयात पावसाने अतिशय गंभीर परिस्थिती केली आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने बळीराजाच्या पाठीशी तातडीने उभे राहून त्यांची दिवाळी समाधानाने जाईल याची व्यवस्था करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

सरकारने शिधा वाटपाची घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे. त्यातून घोषणा केली, मात्र पैशांची जुळणी झालेली नाही, असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही. यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून केले आहे. हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

पाऊस पडणे हे कुणाच्याच हातात नाही पण पडलेल्या पावसाचे पाणी ताबडतोब घालविण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती त्यात पूणे महानगरपालिका कमी पडली असा थेट आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.

पुणे महानगरपालिकेच्या सुविधा, व्यवस्था, नदीपात्रातून जाणारा पाण्याचा वेग या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा मागच्या पाच वर्षात करता आली असती परंतु ती केली नसल्याने पुण्यातील जनतेवर संकट ओढावले असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

पाऊस पडण्याचे नियंत्रण पालिकेकडे नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु संकट पुणे शहरावर आले गाड्या वाहून गेल्या. जर नालेसफाई व इतर गोष्टींकडे लक्ष दिले असते. स्मार्ट सिटी कार्यक्रम राबवला त्यातून कामे केली असती तर चांगलं चित्र दिसले असते. पण वेगळा अनुभव आला, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पुणे महानगरपालिकेत मागील पाच वर्षात 'अर्थाचा अनर्थ' झाला  किंवा काहीच काम झाले नाही. उलट नव्या अतिक्रमणाने, नव्या अडथळयाने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण स्लो झाले म्हणून हे संकट आले असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

पुणे महानगरपालिकेत आलेल्या संकटाची 'शास्त्रीय चौकशी' करणे आवश्यक आहे, अशी मागणी करतानाच असा पाऊस आला की, पूर येतो. मात्र आपण पहातो व विषय सोडून देतो. परंतु पुणे हे देशातील मुंबईनंतर दहाव्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे अशा गुंतवणुकीसाठी योग्य असलेल्या शहरात असे होणे कमीपणाचे आहे. नागरी असुविधा होत असतील तर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
Embed widget