एक्स्प्लोर

Supriya Sule: तेजस्वी सूर्या आणि सुप्रिया सुळेंची संसदेत खडाजंगी..., घराणेशाहीच्या टीकेवरुन सुळेंनी दाखवला सूर्यांना 'आरसा' 

BJP Tejasvi Surya Vs NCP Supriya Sule: खा. तेजस्वी सूर्या यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसला फटकारल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी सूर्या यांचे आमदार रवी सुब्रमण्य यांच्याशी असलेल्या नात्याचा दाखला दिला.

नवी दिल्ली: भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या हे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात, तर मग कर्नाटकातील आमदार रवी सुब्रमण्य यांच्याशी तेजस्वी सूर्यांचा काय संबंध आहे याचा खुलासा त्यांनी करावा असा पलटवार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं. 

देशातील बेरोजगारीच्या विषयावर बोलताना खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, "देशात सध्या बेरोजगारीचा प्रश्‍न नाही आणि देशात जर कोणी बेरोजगार असेल तर ते काँग्रेस पक्षाचे प्रिन्स राहुल गांधी हे आहेत." काँग्रेसवर टीका करताना तेजस्वी सूर्या यांनी त्या पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला. 

तेजस्वी सूर्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "कर्नाटकात रवी सुब्रमण्यम हे भाजपचे आमदार आहेत. तेजस्वी सूर्या त्यांना ओळखतात का आणि जर ते त्यांना ओळखत असतील तर त्यांच्याशी सूर्या यांचं नातं काय हेही सांगावे."

भाजपचे खासदार आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे कर्नाटकातील भाजपचे आमदार रवी सुब्रमण्यम यांचे पुतणे आहेत. 

तेजस्वी सूर्यांना असा प्रश्न विचारताना सुप्रिया सुळे यांनी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पूनम महाजन, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, हिना गावित यांचा दाखला दिला. खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, या सर्वांमध्ये आणि आपल्यामध्ये एक समान गोष्ट आहे ती म्हणजे राजकारणाची पार्श्वभूमी. मी ज्या राजकीय कुटुंबात जन्माला आले आहे त्याचा मला अभिमान आहे, मी ज्यांची मुलगी आहे त्यांचा मला अभिमान आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत यायच्या आधी भारतात उद्योग उभारले गेले नव्हते असं खासदार तेजस्वी सूर्यांनी लोकसभेत वक्तव्य केलं. त्यावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तेजस्वी सूर्या ज्या ठिकाणाहून आलेले आहेत त्या बंगळुरुमध्ये विप्रो आणि इन्फोसिस सारख्या संस्था आहेत. आता देशभर लसीचे वितरण करणारी सीरम इन्स्टिट्यूट पुण्यात आहे."

संबंधित बातम्या: 

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget