एक्स्प्लोर

मराठी भाषा दिनादिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करा : सुप्रिया सुळे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राजकीय नेते वेळोवेळी मागणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केलीय.

Supriya Sule : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. पण अद्याप याबाबत ठोस निर्णय काही झालेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राजकीय नेते देखील वेळोवेळी मागणी करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी लोकसभेत केली आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. साहित्य अकादमीला सात वर्षांपूर्वी यासंदर्भातील शिफारस करण्यात आलेली असल्याचेही सुळे यांनी सांगितले. दरम्यान येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी अशी मागणी देखील सुळे यांनी केली.

काही वर्षांपुर्वी तत्कालीन मंत्री महोदयांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते. गेल्याच आठवड्यात मंत्री मेघवाल यांनी  राज्यसभेत तेच उत्तर दिले. जगभरातील लाखो लोक मराठी भाषेवर प्रेम करतात. अनेक महान  साहित्यिक या भाषेत होऊन गेले. ही भाषा संतांची आहे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन पण आहे.  हे सर्व लक्षात घेता याच महिन्यात 27 फेब्रुवारी रोजीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात यावी अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याबाबत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाविषयी महत्वाची माहिती दिली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असे मंत्री मेघवाल यांनी सांगितले होते.

देशात आजवर 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली आहे. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया भाषांना हा दर्जा दिला गेला. महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये याबाबत एक भाषा समिती स्थापन केली. त्या समितीने आपला अहवाल 2013 मध्ये पूर्ण केला. तेव्हापासून म्हणजे जवळपास 9 वर्षे ही मागणी केंद्राकडे पडून आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2026 | रविवार
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget