एक्स्प्लोर

Maharashtra Civic Polls: 'युती की स्वबळ?' आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग; प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित!

महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका जाहीर होताच भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांनी नावांची यादी पाठवली आहे.

Maharashtra Civic Polls : महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका जाहीर होताच भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांनी नावांची यादी पाठवली आहे. 'मित्र पक्षांसोबत युती करायची की नाही करायची, युती करायची असेल तर कशाप्रकारे पुढे जायचं? नसेल करायची तर स्वबळासंदर्भात लढण्याची तयारी आहे की नाही? यासंदर्भात देखील या सगळ्या निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने प्रत्येक नगरपालिकेमध्ये निरीक्षक (Observer) पाठवून मोर्चेबांधणी केली होती. या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि शहर कार्यकारिणीशी चर्चा करून प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना सादर करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात नगराध्यक्ष (Nagaradhyaksha) कोण असावा, याबाबतही निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत.

Local Body Polls: अखेर मुहूर्त ठरला! 246 नगरपरिषद, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Local Body Elections) कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. यानुसार, राज्यातील 246 नगरपरिषदा (Municipal Councils) आणि 42 नगरपंचायतींसाठी (Nagar Panchayats) 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असेल. ही निवडणूक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVMs) पार पडेल आणि यासाठीची आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे. या निवडणुका ऑक्टोबरच्या अखेरीस अद्ययावत केलेल्या मतदार यादीनुसार घेण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Maha Civic Polls: मुंबईसह 29 महापालिकांच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम बदलला

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) मतदार यादीचा कार्यक्रम बदलला आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, 'प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी आता 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल'. यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन कार्यक्रमानुसार, मतदार याद्यांवरील हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबरपर्यंत असेल.

प्राप्त झालेल्या हरकती निकाली काढून 6 डिसेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, 8 डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, मतदार नोंदणीसाठीच्या कट-ऑफ डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातमी:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
Hasan Mushrif: तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा
तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा!
Prashant Kishor: आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
Karnataka Congress Crisis: 'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Crime : मोबाईल दिला नाही म्हणून चणकापूरमधील 13 वर्षांच्या मुलीनं जीवन संपवलं
Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये काही मास्तरांचाही समावेश
Hasan Mushrif: तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा
तो सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? खैर केली जाणार नाही, तुमचं भविष्य संकटात येणार; हसन मुश्रीफांचा थेट 'अजितदादा स्टाईल'ने धमकीवजा इशारा!
Prashant Kishor: आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
आव्हान, प्रतिआव्हान देऊनही बिहारी निवडणुकीत पदरी घोर निराशा; अखेर प्रशांत किशोरांनी निर्णय घेतलाच!
Karnataka Congress Crisis: 'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
'गटबाजी माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत..' जिद्दीला पेटलेल्या डीके शिवकुमारांनी डरकाळी फोडताच सिद्धरामय्यांचा तगडा निर्णय
Dhule Crime: धुळ्यात संतापजनक घटना, चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, लेकराची पाठ होरपळली, पोलिसांकडून दोघांना अटक
धुळ्यात संतापजनक घटना, चोरीच्या संशयावरुन चिमुकल्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावला, लेकराची पाठ होरपळली, पोलिसांकडून दोघांना अटक
Nagpur Crime News: आत्याच्या घरी लग्नाची घाई; कुटुंबीय तयारीत मग्न, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीनं घरात जाऊन गळ्याला दोर लावला
आत्याच्या घरी लग्नाची घाई; कुटुंबीय तयारीत मग्न, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीनं घरात जाऊन गळ्याला दोर लावला
PHOTOS: वाढदिवसाची सुरुवात बाप्पांच्या चरणी; अमृता खानविलकरने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
वाढदिवसाची सुरुवात बाप्पांच्या चरणी; अमृता खानविलकरने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
Ind vs Sa 2nd Test : घर पे खेल रहे हो क्या...; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video
घर पे खेल रहे हो क्या...; अंपायरची वॉर्निंग, कर्णधार ऋषभ पंतचा पारा चढला, कुलदीप यादवला नको नको ते बोलला, नेमकं काय घडलं? पाहा Video
Embed widget