Harshwardhan Sapkal & Sandeep Joshi: हर्षवर्धन सपकळांच्या #$# असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचं कुलूप तोडून दाखवावं, भाजपचे संदीप जोशी संतापले
Harshwardhan Sapkal on RSS: पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखपदी दलित, मुस्लीम किंवा महिलेची नेमणूक कधी करणार, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला.

नागपूर: नागपूरच्या दंगलीनंतर या हिंसाचाराची आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल, याची भीती वाटल्याने भाजपने औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन माघार घेतली, अशी टीका करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यावर भाजप आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) यांनी जोरदार टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या (RSS) कुलुपाला हात लावायची हिंमत कोणाच्याही %$मध्ये नाही. हर्षवर्धन सपकाळांच्या #$मध्ये दम असेल तर त्यांनी इकडे येऊन संघाच्या मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावून दाखवावा. मग ते आहोत आणि आम्ही आहोत. त्यांना असल्या वल्गना करायच्या होत्या, तर त्या आधी करायला पाहिजे होत्या. नागपूरची दंगल ही केवळ चार तासांमध्ये आटोक्यात आली. ही दंगल कोणी घडवली, कशासाठी घडवली, हे सर्वांना माहिती आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी चिथावणीखोर वक्तव्ये करण्यापेक्षा खरी सद्भावना दाखवावी, असे संदीप जोशी यांनी म्हटले.
भाजप किंवा संघाने औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन कोणतीही माघार घेतलेली नाही. संघाची भूमिका आहे की, हे सर्व हे सर्व विषय संपलेले आहेत, मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने औरंगजेब आणि अफजलखानाला या महाराष्ट्राच्या भूमिकेत गाडलेलं आहे. त्यामुळे आता या विषयाला फार उचलण्याची गरज नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य हास्यास्पद आणि चिथावणीखोर आहे. त्यांना माहिती होते का, मुस्लीम बांधव संघ कार्यालयावर हल्ला करायला जाणार होते, संघ कार्यालयाचे कुलूप तोडणार होते. याची माहिती हर्षवर्धन सपकाळांना आधीपासूनच होती तर त्यांनी ती इंटेलिजन्सला दिली पाहिजे, असे संदीप जोशी यांनी म्हटले.
नागपूर दंगलीवेळी त्याठिकाणी फक्त नागपूर मध्यचे आमचे आमदार प्रवीण दटके होते. काँग्रेसचा एकही आमदार तिकडे सद्भावना दाखवण्यासाठी उपस्थित नव्हता. काँग्रेसकडून काढण्यात आलेली सद्भावना यात्रा ही नौटंकी आहे. हीच काँग्रेस पक्षाची खासियत आहे. नागपूर दंगलीत हिंदूंची घरं जाळण्यात आली, दुकाने फोडण्यात आली. तरी काँग्रेस पक्ष मतांसाठी मुस्लिमांसोबत उभा राहतो. नागपूरमधील वातावरण आता शांत झाले आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळांनी अशाप्रकारची वक्तव्य करणे टाळावे. मी काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचं अभिनंदन करतो. त्यांनी नागपूर दंगलीवेळी आगीत तेल टाकलं नाही. हे सगळं कसं विझवलं जाईल, हे बघितलं, अशी टिप्पणी संदीप जोशी यांनी केली.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
विषमतेचे बीज पेरणारा भारतामध्ये जो विचार आहे, ते रेशीमबागेत बसलेले आहेत. ते आपल्या सगळ्यांना लढवण्याचं आणि देशात आग लावण्याचं काम करत आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारला, देशाच्या स्वातंत्र्याविरोधात भूमिका घेणारे आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणाऱ्या अनेकांच्या कबरी, समाध्या आणि पुतळे आपण उद्ध्वस्त करणार का? हा प्रश्न विचारल्यावर करंट लागला. तेव्हा नागपूरची दंगल झाली. तेव्हा समजलं की, दुसऱ्याचं घर जाळलं तर आपलंही घर जळतं. एका मिनिटांत झटका लागला, लाईट लागला. हा खेळ अंगलट येऊ शकतो हे लक्षात आल्यावर कबरीच्या मुद्दयावरुन विथड्रॉवल होण्याची भूमिका घेतली. हे आपल्या रेशीबागेत घुसले भकाभका तर काय होईल? रेशीमबागेच्या कंपाऊंडची कुलुपं कधीही तोडली जातील. म्हणून त्यांनी घाबरुन वेगळी भूमिका घेतली, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
























