एक्स्प्लोर

प्रणिती शिंदेंनी आपलं अज्ञान तपासावं; खासदार आहात, जबाबदारीने वागा; भाजपचा बोचरा पलटवार

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आपले अज्ञान तपासावे. आपण खासदार आहात जबाबदारीने वागा असे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलं.

Bjp on Praniti Shinde : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आपले अज्ञान तपासावे. आपण खासदार आहात जबाबदारीने वागा असे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetty) यांनी केले. कदाचित घाईने वक्तव्य करायची त्यांना सवय आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेत रेशन तांदूळ आणि विमानसेवेसंदर्भात केलेल्या आरोपांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिलं आहे. 

काय काम केले ते सांगण्यासाठी  प्रणिती शिंदेंकडे एकही गोष्ट नाही

खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडून आल्यानंतर काय काम केले ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही गोष्ट नाही, शिंदे यांनी एअरपोर्ट तयार केले ते पण अर्धवट होते. डीजीसीच लायसनही त्यांच्या काळात नव्हतं. आता उडान योजनेतून सोलापूर विमानतळासाठी 64 कोटी रुपये दिल्यानंतर काम पूर्ण झाल्याचे कल्याणशेट्टी म्हणाले. 24 ऑक्टोबर ही बिडिंग प्रोसेससाठी तारीख आहे, त्यानंतर विमानसेवेचा निर्णय देखील होईल. सोलापूर विमानतळावरून विमान लँडिंग आणि टेकऑफ करतील त्यामुळे चिंता करू नये. विमान कंपन्यांसाठी सध्या उडान योजनेतून विमान सेवा सुरू करण्यात येईल का? ते आम्ही पाहत असल्याचे कल्याणशेट्टी म्हणाले. 

 प्रणिती शिंदेंचा आरोप हास्यास्पद 

प्रणिती शिंदे तुम्ही राहायला मुंबईला आहात. सोलापूर विमानतळावरून मुंबई, तिरुपती आणि हैदराबाद अशा विमानसेवा सुरू होतील. प्रणिती शिंदे यांनी लोकांना भ्रमित करण्याचे वक्तव्य करू नये असेही कल्याणशेट्टी  म्हणाले. खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्लॅस्टिकच्या तांदुळाबाबत उल्लेख केला तो हास्यास्पद प्रकार आहे. खासदार ताई ते प्लास्टिकचे तांदूळ नाहीत तर फोर्टीफाईड तांदूळ आहेत. लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी न्यूट्रिशन मिळावे यासाठी ते तांदूळ दिले जातात. कदाचित तुम्हाला घाईने वक्तव्य करायची सवय आहे असे कल्याणशेट्टी म्हणाले.

तांदुळाबाबत प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य चुकीचं

आपण खासदार आहात जबाबदारीने वागा, असा सल्लाही कल्याणशेट्टी यांनी दिला. आपण केलेल्या वक्तव्य एकदा तपासून पहा त्याचा काही परिणाम होतो तेही पहा. महायुतीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शासन आहे. सोलापूरच्या विकासासाठी सदैव कर्तव्यदक्ष आहोत असंही कल्याणशेट्टी म्हणाले. सोलापूर विमानतळावरून प्रणिती शिंदे लवकरच विमान सेवेचा लाभ घेऊ शकतात. तांदुळाबाबत प्रणिती शिंदे यांचे जे वक्तव्य केलं ते साफ चुकीचा आहे. त्यांनी एकदा आपलं अज्ञान तपासावे असंही कल्याणशेट्टी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

सोलापूर लोकसभेतील सहाच्या सहा मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा, प्रणिती शिंदे यांचा मागणीला दुजोरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमीZero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय?Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रAaditya Thackeray : अबू आझमींना ईडीची भीती होती का? आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
Embed widget