ठाकरेंनी शेण खावं की xx , दोन्ही सारखंच, केजरीवालांप्रमाणे ठाकरेही जेलमध्ये जाणार : प्रसाद लाड
उद्धव ठाकरेंनी भाजपच्या बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत . कारण ते चुकीच्या मार्गाने चालले होते. ज्या प्रमाणे केजरीवाल वाचले नाही त्याप्रमाणे हे देखील वाचणार नाहीत, असेही प्रसाद लाड म्हणाले.
मुंबई : आम्ही शेण खाल्ले म्हणून तुम्ही शेण खाताय? तुम्ही आता काय करतायं? उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. उद्धव ठाकरेच्या न तुम्ही शेण खाताय? या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांची जीभ घसरली आहे. ठाकरेंनी शेण खावं की xx , दोन्ही सारखंच आहे, असे म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच केजरीवालांप्रमाणे ठाकरेही जेलमध्ये जाणार असेही ते म्हणाले. माध्यमांशी ते बोलत होते.
प्रसाद लाड म्हणाले, देशात एक पप्पू आहे. त्याप्रमााणे राज्यात देखील उद्धव ठाकरे नावाचा पप्पू आहे. उद्धव ठाकरे म्हटले की, मी शेण खाल्ले म्हणून तुम्ही शेण खाणार का? ते शेण काय शेणाच्या पलीकडे सगळे खाल्ले आहे. खिचडी, मिठी नदीच्या चिखलातील देखील खाल्ले.... मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम कोणी केले असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, संजय राऊतांनी केले आहे.
माणूस शेण खाऊदे किंवा ** खाऊ दे सारखाच : प्रसाद लाड
कोरोना काळात जीव वाचवणारे रेमेडिसीव्हर औषध कुठेच मिळत नव्हते. त्या रेमडिसीव्हर औषध पुरवण्याची सोय मी आणि प्रविण दरेकरांनी केली. ते औषध आम्हाला 350 रुपयांना मिळत होते. पण त्यांना ते 1600 ला विकत घ्यायचे होते. ज्यामुळे माणसाचा जीव वाचत होता त्यामध्ये देखील यांना दलाली खायची होती. मेलेल्या माणसाची प्लास्टिकची बँग त्यामध्ये देखील 4500 हजार खायचे होते. मेलेल्या माणसाच्या टाळुवरील लोणी खाणारा माणूस शेण खाऊदे किंवा ** खाऊ दे सारखाच आहे, असे प्रसाद लाड म्हणाले.
केजरीवाल वाचले नाही त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वाचणार नाहीत : प्रसाद लाड
प्रसाद लाड म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरेसारखे धंदे करणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत . कारण ते चुकीच्या मार्गाने चालले होते. ज्या प्रमाणे केजरीवाल वाचले नाही त्याप्रमाणे हे देखील वाचणार नाहीत.
राऊत नावाचा पोपट काय बोलतो हे आता महाराष्ट्रातील जनता ऐकत नाही : प्रसाद लाड
संजय राऊतांवर देखील प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. प्रसाद लाड म्हणाले, संजय राऊतांकडे बोलायला काही रहिले नाही. ते भ्रमिष्ठ आणि बिथरलेले आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत सातत्याने राहिल्याने त्याचे गुण आणि अवगुण दोन्ही येतात. संजय राऊतांचे दोन्ही गुण उद्धव ठाकरेंकडे उतरले आहेत. आता राऊत नावाचा पोपट काय बोलतो हे आता महाराष्ट्रातील जनता ऐकत नाही.
हे ही वाचा :