एक्स्प्लोर

Mahesh Landge: मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे; महेश लांडगेंनी अजितदादांविरोधात दंड थोपटले

Mahesh Landge & Ajit Pawar पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आम्ही पण 2017 पासून विकास केलेला आहेच ना? हे कसं काय नाकारता? महेश लांडगेंचा अजित पवारांना सवाल

Mahesh Landge and Ajit Pawar: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. याच वादातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे, असे सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांविरोधात शड्डू ठोकला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने पिंपरी-चिंचवडचा विकास केला. पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो, असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे आता यावरुन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. 

पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आता दिव्यांग भवन कोणी उभारले. याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती. 2017ला पालिकेत भाजपची सत्ता आली, त्यानंतर हे दिव्यांग भवन यासंह अनेक विकास झाला. त्यामुळं या शहराच्या विकासात आमचं ही योगदान आहे. इतरांचे योगदान आम्ही नाकारत नाहीच. मात्र, बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही. शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं? घंटा..... म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का? आता गेली 30 वर्षे काय केलं असं जे जे येऊन सांगतायत, ते आम्ही कुठं नाकारत आहोत. तुम्ही केलं की पण आम्ही पण 2017 पासून विकास केलेला आहेच ना? हे कसं काय नाकारता, असे महेश लांडगे यांनी म्हटले.

आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की कामं. आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत. खासदार अप्पा बरोबर आहे का? जे चांगलं ते चांगलं, मी कोणाला घाबरत नाही. पैलवान आहे, सर्वांना अंगावर घायची सवय आहे. स्पष्ट सांगताना माझा पाऊल डगमगणार नाही. देवेंद्र भाऊ करुन जातो आम्ही नाव दुसऱ्याचं लागतं. जरा माझं पण नाव कुठं तरी लिहावं. आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Devendra Fadnavis: महेश लांडगेंच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महेश लांडगे यांना सबुरीचा सल्ला दिला. फडणवीसांनी म्हटले की, महेश लांडगे खूप चिंता व्यक्त करत आहेत. आम्ही काम करतो अन श्रेय दुसरे घेतात. पण मी सांगतो की 'ये पब्लिक है, ये सब जानती है.' आपण दुसऱ्याचे श्रेय घेऊ शकत नाही अन आपलं श्रेय दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळं फार चिंता करायचं नाही, आपण काम करत राहायचं. जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. ते आपण निवडणुकीत पाहिलं ना, जनतेने तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला दिलेलं आहे. आपण अनेक कामं केली, पण ते विषय आपण प्रतिष्ठेचे केले नाहीत. आता तुम्ही म्हणाले चिखलीचा टिपी नको, चला आत्ताच आयुक्तांना सांगतो तो टिपी फक्त स्थगित नाही तर तो रद्दच करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेची महती सांगताना म्हटले की, आपला विचार हा वैश्विक विचार आहे. जगाला साद घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे. त्यामुळं हा विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे. अर्थात जोपर्यंत वारी आहे तो पर्यंत हा विचार संपणार नाहीच. कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत वारी असणार आहेच. मूलतत्त्व ठेवून आधुनिक मार्गाने संतांचे विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल. इंद्रायणी स्वच्छ करायचं आपण हे नेहमी म्हणतो. मात्र जो पर्यंत सिवेज योग्यरीत्या होणार नाहीत, तो पर्यंत हे अशक्य आहे. त्यादृष्टीने आपण आज दोन एसटीपीचे लोकार्पण केले आहे, असे फडणवीसांनी  सांगितले.

आणखी वाचा

राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
आआथातू अरअरअर... करत जरांगेंनी बाहुबलीमधील कल्की स्टाईलने उडवली बावनकुळेंची खिल्ली, महसूलमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर  
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार
संजय राऊत नोटा मोजायला गेले होते का? तुमच्याकडं फोटो पुरावा आहे का? राऊतांच्या आरोपावर रामदास कदमांचा पलटवार

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget