मुंबईभाजपाचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. याच चंद्रकांत पाटील यांच्या लग्नाची गोष्ट खास आहे. चंद्रकांत पाटील आणि त्यांची पत्नी अंजली पाटील यांच्या एका कॉमन मित्राने हे लग्न जुळवून आणले होते. याच लग्नाचा किस्सा चंद्रकांत पाटील आणि अंजली पाटील (Anjali Patil) यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या कार्यक्रमात सांगितला. 


आमचा एक कॉमन मित्र आहे त्याने


चंद्रकांत पाटील यांनी दादांची पहिली भेट कधी झाली, कशी झाली हे खरंतर आठवणार नाही. अगदी अकरावीपासून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत होते. तेव्हा दादा पूर्णवेळ काम करत असावेत. मला आठवत नाहीये. पण चंद्रकांतदादा (Chandrakant Patil ) कदाचित राज्यपातळीवर काम करत असावेत. आम्ही लग्नासाठी खूपच वर्षांनी म्हणजे 2004 साली भेटलो. आमचा एक कॉमन मित्र आहे. त्याने माझ्याकडे चंद्रकांतदादांसाठी विचारण केली. त्यानंतरही मी विचार करायला खूप वेळ घेतला. मी होकार देण्यासाठी दोन-अडीच महिने घेतले असतील. माझं त्या वेळेला ऑडिटचं काम चालू होतं. सप्टेंबरपर्यंत आमचं खूप काम चालतं. अगोदर ऑडिट आणि मग चंद्रकांतदादांचा विचार केला, अशी आठवण अंजली पाटील यांनी सांगितली.


तशीच जबाबदारी तुझी असेल का?


मी वयाच्या 36 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी लग्न केलं पाहिजे, असा आग्रह माझे मित्र करायचे. आमचा अभय बापट नावाचा एक कॉमन मित्र आहे. तो पार्ले येथे राहतो. अंजली आणि तिचा भाऊ असे ही दोघेच भावंडं होती. आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी अजली यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अशा वेळा बापटने हा प्रस्ताव आणला होता. माझ्या आई-वडिलांची जबाबदारी ही माझी आहे. तशीच जबाबदारी तुझी असेल का? असे मला अंजलीने विचारले. मी पहिल्याच भेटीत हो म्हटलं. थोडा विश्वास यायला तिला वेळ लागला. त्यामुळे अंजली कधी उत्तर देणार? या प्रश्नापोटी मी अस्वस्थ नव्हतो, अशा भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.


मी त्यांना भेटले तेव्हा....


"आई-बाबांची जबाबदारी ही माझ्यासाठी महत्त्वाची होती. आई-बाबांना परदेशात जायचं नव्हतं. त्यामुळे माझ्या आई-बाबांची सर्वार्थाने काळजी घेईल असा जोडीदार मिळाला तर माझी हरकत नव्हती. हा मुद्दा जेव्हा मी त्यांच्यापुढे (चंद्रकांत पाटील) मांडला होता. तेव्हापासून त्यांनी ही जबाबदारी पूर्णपणे सांभाळलेली आहे. बाबांना बरं नव्हतं. तेव्हा त्यांनी दोन महिन्यांत तीन खोल्यांचं घर बांधलं होतं. मी त्यांना भेटले तेव्हा मला त्यांच्याबाबत विश्वास वाटला. कारण एखादा शब्द दिला की काहीही झालं तरी तो शब्द ते पाळतात. त्यामुळे मी वेळ घेतला आणि तो यशस्वी झाला. चंद्रकांतदादा यांचा ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणूनच संपर्क आला होता," असे अंजली पाटील यांनी सांगितले.


ते घरासाठी अजिबात वेळ देत नाहीत


अंजली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे राजकारण, समाजकारण याबाबतही सांगितलं. "खरं म्हणजे चंद्रकांत पाटील तेव्हाही खूप सक्रिय होते. आता ते समाजकारण आणि राजकारण असं दोन्हीही करतायत. त्यांचा समाजकारण, प्रवास असा भरपूर वेळ जायचा. पण तरीदेखील ते घरासाठी थोडा वेळ द्यायचे. पण आता ते घरासाठी अजिबात वेळ देत नाहीत. पण नवीन क्षेत्र निवडलं जातं, पक्ष एखादी जबाबदारी देतो तेव्हा चॉईस नसते. पण ते अजूनही दोन्ही बॅलेन्स करत आहेत," असं अंजली पाटील यांनी सांगितलं. 


पाहा व्हिडीओ :



हेही वाचा :


जावई नेमका कसा शोधला? शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाची गोष्ट!


मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!


मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण