मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या रुपात एकमेव कन्या आहेत. त्यांना मुलगा नाही. आपल्या याच एकुलत्या एका मुलीबाबत शरद पवार यांनी दिलखुलासपणे भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.
जवळचे लोक सुचवतील तो जावई
सुप्रियाच्या लग्नात माझा फारसा रोल नव्हता. बाळासाहेब ठाकरे, माधव आपटे यासारख्या काही जवळच्या मित्रांनी स्थळ सुचवलं होतं. माधव आपटे म्हणेज उद्योजक. या लोकांनी स्थळ सुचवलं होतं. माझ्या जावयांचे वडील आणि ते माधव आपटे मित्र होते. त्यामुळे हे स्थळ सुचवण्यात आलं. स्थळ सुचवल्यानंतर सुप्रिये सुळे आणि त्यांचे पती दोघेजण भेटले होते. साधारणत: जवळचे लोक सुचवतील तो जावाई, असं माझं सूत्र होतं, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच सुप्रिया सुळे यांनीदेखील माझ्या लग्नात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सांगितले. त्यांनी राज्यातील राजकारण, सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केलं.
पाहा व्हिडीओ :
सुप्रिया सुळेंबद्दल अभिमान कधी वाटतो?
शरद पवार यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावरही भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सर्वांत अगोदर कधी अभिमान वाटला असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना "राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे यांना संसदेत रिकग्निशन मिळतं तेव्हा आत्मिक समाधान मिळतं. कारण हे रिकग्निशन सर्वांना मिळत नाही," अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
मराठा-ओबीसी आरक्षणावर मांडली भूमिका
शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही भूमिका मांडली. संवाद वाढवला पाहिजे. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर लोकांशी संवाद साधणार आहे. सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. ही परिस्थिती मिटवायला पाहिजे. संवाद संपतो तेव्हा गैरसमजुती होतात, असे शरद पवार म्हणाले.
हेही वाचा :
मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!
मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण