Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशभरात सुरु झालेल्या दंगली आणि हिंसाचारावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपककडून देशात हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. 'देशभरामध्ये जे दंगे सुरू आहेत हे देशातील सत्ताधारी पक्ष भाजपने प्रायोजिक केले आहेत. याआधीही जनतेनं रामनवमी आणि हनुमान जयंती सारखे सण साजरे केले आहेत. तेव्हा दंगली झाल्या नाहीत. दिल्ली हे राज्य केंद्रशासित आहेत. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे', असं म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत.
राऊत पुढे म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून तिथे दंगे सुरु आहेत. याचं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुका आहे. निवडणुकांवर भाजपचं लक्ष्य आहे. आधी भाजपनं पराभवाच्या भीतीने निवडणुकांच्या तारखा बदलल्या. आता हातून महापालिका गेली, असं वाटत असताना भाजपकडून दंगे सदृश्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. मुंबईमध्ये भोंग्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख शहरांमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, व्यापार उद्योग याला मोठा धक्का बसला आहे.'
कोरोनानंतर आता कुठे अर्थ व्यवस्था सुरळीत होतेय, मात्र काही लोकं उगाच अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे. 'कोरोनानंतर आता लोकांना रोजगार मिळायला सुरुवात झाली आहे. लोक आता कुठे काम धंद्याला लागली असून त्यांच्या घरी चुली पेटत आहेत. उद्योगपती आणि व्यापारी धक्क्यातून सावरत आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. मात्र, परत दंगे घडवायचं काम सुरु आहे. याचा परिणा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय गुंतवणुकीवर होत आहे.', असं राऊत म्हणाले आहेत.
देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. यावेळी ते म्हणाले की, देशातील प्रमुख शहरांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे देशातील उद्योगपती या शहरांमध्ये गुंतवणूक करण्यास तयार नाहीत. मजूरवर्गही या शहरांमध्ये राहण्यास तयार नाही. असे अनेक प्रश्न या दंगलींमुळे निर्माण झाले आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पार्टी आहे. त्यांना या देशाचं, या देशातील जनतेचं, शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त दंगलीचं राजकारण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. हे या देशाचं दुर्दैव आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Angarki Sankashti Chaturthi 2022 : आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व...
- Coronavirus New Cases : दिलासादायक! नवीन रुग्णांमध्ये 43 टक्के घट, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1247 नवे रुग्ण
- Amway Money Laundering : अॅमवेवर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त; जाणून घ्या प्रकरण
- Amarnath : अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट, टीआरएफ संघटनेची धमकी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha