Amarnath Yatra News : अमरनाथ यात्रा जूनमध्ये सुरू होणार आहे. कोरोनामुळे यात्रा दोन वर्ष रद्द झाली होती. त्यानंतर आता अमरनाथ यात्रेबद्दल भाविकांमध्ये उत्साह आहे. यावेळी अमरनाथ यात्रेत लाखो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. या यात्रेवर आता दहशतवादाचं सावट आहे. या यात्रेला 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये या यात्रेदरम्यान हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.


अमरनाथ यात्रेचं राजकारण केल्याचा आरोप
काश्मीरची दहशतवादी संघटना टीआरएफनं म्हटलं आहे की, दरवर्षी 15 हजार यात्रेकरुंऐवजी आता आठ लाख लोक अमरनाथ यात्रेला येणार आहेत. तसेच 15 दिवसांऐवजी 75 दिवसांची यात्रा होणार आहे. यामुळे अमरनाथ यात्रेचं राजकारण होत आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, श्राइन बोर्डाकडून नुकतीच घोषणा करण्यात आली होती की, तीन लाख भाविक पवित्र गुहेचत दर्शन घेऊ शकतील आणि यात्रा 75 दिवस चालेल. सरकारला या पवित्र स्थळाचं भगवीकरण करायचं आहे, असं टीआरएफनं म्हटलं आहे.


टीआरएफने दिली 'ही' धमकी 
टीआरएफ संघटनेनं लोकांना सरकारच्या या अजेंड्यात सामील न होण्यास सांगितलं आहे. सरकार लोकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या संघटनेनं केला आहे. लोकांनी सरकारच्या आवाहनाला बळी पडून नये, असं टीआरएफनं म्हटलं आहे. टीआयएफने म्हटलं आहे की, 'त्यांचे सहकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही प्रकारची चिथावणीखोर चालीमुळे रक्तपात होण्याची शक्यता आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha