Delhi Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये.
फोनवरून पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या
दिल्लीत अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचारानंतर लगेचच अमित शाह यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केली आणि योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिल्ली हिंसाचारावर राजकारण तापलं
दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरून देशभरात राजकरण तापलं आहे. या घटनेबाबत केंद्रातील विद्यमान सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या मौनावर विरोधी पक्ष सवाल करत आहेत. यावर आता भाजपकडूनही उत्तर दिले जात आहे. दिल्लीतील पोलीस आणि कायदा आणि सुव्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते, त्यामुळेच केंद्र विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मात्र याला उत्तर देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वतीने एक पत्र जारी करण्यात आले असून त्यात काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींचा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानमधील करौली येथील हिंसाचारावर भाजप नेते गौरव भाटिया यांनी काँग्रेसकडे उत्तर मागितले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
- Delhi Violence : जहांगीरपुरी दगडफेक प्रकरणात 21 जणांना अटक, दोन आरोपी अल्पवयीन, पिस्तूलांसह तलवारी जप्त; जाणून घ्या प्रकरण
- काल दिल्लीत हिंसाचार, आज हिंदू संघटनांनी काढली रथयात्रा; लहानग्यांच्या हातातही नंग्या तलवारी
- Hanuman Jayanti: दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीत गोंधळ, दगडफेक आणि तोडफोड; अनेक पोलिसही जखमी