भाजपमध्ये मोठे फेरबदल; विनोद तावडेंना दिली मोठी जबाबदारी, बनवले बिहारचे प्रभारी
Vinod Tawde Made In Charge Of Bihar: भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवर पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. आजच पक्षाने राज्यांच्या नवीन प्रभारींची घोषणा केली आहे.
Vinod Tawde Made In Charge Of Bihar: भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवर पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. आजच पक्षाने राज्यांच्या नवीन प्रभारींची घोषणा केली आहे. यातच राज्यचे माजी मंत्री विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी बनवण्यात आले आहे. ओम माथूर यांची छत्तीसगडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालची जबाबदारी मंगल पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंगल पांडे बिहारमध्ये आरोग्य मंत्री आहेत.
बिहारमध्ये भाजपची सात सोडून आरजेडीसोबत नितीश कुमार यांनी सत्ता स्थापन केली आहे. यामुळे पक्षाला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. अशातच आता बिहारमध्ये पक्ष आणखी बळकट करण्याची जबाबदारी ही तेथील स्थानिक नेत्यांसोबतच विनोद तावडे यांच्यावरही आहे. अलीकडेच भाजपने तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती. यामुळे हळूहळू आता तावडे राष्ट्रीय राजकारणात आणखी सक्रिय होताना दिसत आहे.
मध्य प्रदेशमध्ये पंकजा मुंडे यांना संधी
भाजपने राज्यांसाठी नवीन नियुक्त केलेल्या प्रभारींमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. बिप्लब कुमार देब यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी, तर राधामोहन अग्रवाल यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशात पंकजा मुंडे आणि डॉ.रमाशंकर कथेरिया यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
आमदार विजय रुपानी यांना पंजाबचे प्रभारी तर डॉ.नरेंद्र सिंह रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन यांची तेलंगणचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी खासदार केले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सहप्रभारी असतील. खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
बिल्किस बानो प्रकरणाची सुनावणी 3 आठवडे पुढे ढकलली, सुटका झालेल्यांनाही मिळणार आपली बाजू मांडण्याची संधी
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर केजरीवाल यांनी घेतली नायब राज्यपालांची भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा