(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर केजरीवाल यांनी घेतली नायब राज्यपालांची भेट, या मुद्द्यांवर झाली चर्चा
Delhi LG Vs Arvind Kejriwal: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लेचे नायब राज्यपाल आणि आम आदमी सरकारमध्ये वाद सुरु आहे. यामध्येच दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु आहे.
Delhi LG Vs Arvind Kejriwal: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लेचे नायब राज्यपाल आणि आम आदमी सरकारमध्ये वाद सुरु आहे. यामध्येच दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु आहे. आता याच दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना यांची भेट घेतली आहे. मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या छापेमारीनंतर नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांची पहिल्यांदाच भेटले होत आहे.
कोणत्या मुद्द्यावर झाली चर्चा?
नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट सुमारे 40 मिनिटे चालली. याबाबत बोलताना केजरीवाल यांनी सांगितले की, नायब राज्यपाल यांची भेट घेतल्यानंतर या बैठकीत दिल्लीतील कचरा समस्या आणि स्वच्छतेवर चर्चा झाली. आगीच्या घटनेतील मृत्यूवर केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकार संपूर्ण मदत करेल. दोघांमध्ये अतिशय चांगल्या वातावरणात चर्चा झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे. दिल्लीशी संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांची नियमित बैठक होत असते. मात्र काही काळापासून यांच्यात बैठक झाली नव्हती.
मुद्रांक शुल्क प्रकरणी केजरीवाल यांच्या चौकशीचे आदेश
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तीन भूखंड 4.45 कोटी रुपयांना विकल्याचा आणि कागदावर त्यांची किंमत केवळ 72.72 लाख रुपये दाखवल्याचा आरोप आहे. तसेच त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या मदतीने त्यांनी 45,000 रुपये प्रति चौरस यार्ड या बाजारभावाने भूखंड विकले. परंतु व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये प्रति चौरस यार्ड 8,300 रुपये दाखविण्यात आले, असा आरोप आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर 25.93 लाख रुपयांच्या मुद्रांक शुल्क चोरीचा आरोपही करण्यात आला होता. ही तक्रार लोकायुक्तांमार्फत नायब राज्यपाल यांच्याकडे पाठवण्यात आली होती. ज्यामध्ये त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. आता नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी ही तक्रार मुख्य सचिवांकडे पाठवली आहे. यावर पुढे काय कारवाई सुरु आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.