(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madha Loksabha : भाजपने मोहिते पाटलांविरोधात कंबर कसली, कट्टर विरोधक बबनदादा आणि शिवाजी सावंत निंबाळकरांसाठी एकत्र येणार
BJP vs Mohite Patil, Madha Loksabha : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक मोहिते पाटील (Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) एकत्र आले आहेत.
BJP vs Mohite Patil, Madha Loksabha : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील कट्टर विरोधक मोहिते पाटील (Mohite Patil) आणि उत्तम जानकर (Uttam Jankar) एकत्र आले आहेत. त्यानंतर भाजपने मोहिते पाटलांविरोधात कंबर कसली आहे. मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यानंतर भाजपने कट्टर विरोधक असलेल्या आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. दोन्ही नेते एकत्र आल्याने भाजपला दिलासा मिळणार आहे. कारण दोन्ही नेते युतीधर्म पाळून भाजपसाठी काम करणार आहेत.
शिंदे-सावंत युती महायुतीला 1 लाखाचे मताधिक्य देईल
माढा तालुक्यात गेली 35 वर्षे आमदार बबनदादा शिंदे यांची सत्ता आहे. त्यांना कट्टर विरोध करण्याचे काम आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत करत आले आहेत. दरम्यान, माढातील कट्टर विरोधक भारतीय जनता पक्षासाठी एकत्र आले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून शिंदे-सावंत युती महायुतीला 1 लाखाचे मताधिक्य देईल, असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी सावंत यांच्याशी चर्चा केली
माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजित निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सुरुवातीपासून सावंत हे निंबाळकर यांच्या विरोधात काम करत होते. तर आमदार बबनदादा शिंदे हे निंबाळकर यांच्या सोबत असल्याचे चित्र होते. यानंतर शिवबाबा मोहिते पाटील यांनी सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवाजी सावंत कोणती भूमिका घेणार, यावरुन भाजपची डोकेदुखी वाढली होती. मात्र रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्ज भरायला आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी सावंत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सावंत निंबाळकरांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
शिंदे आणि सावंत हे कट्टर विरोधक भाजपासाठी एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शिंदे-सावंत युती माढा तालुक्यातून 1 लाखाचे मताधिक्य देणार असा दावा सावंत यांच्याकडून केला जातोय. माढा तालुक्यात शिंदे यांचा प्रमुख गट असून त्याखालोखाल शिवाजी सावंत यांची ताकद आहे. रणजित निंबाळकर यांनी आज (दि.21) शिवाजी सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर सावंत यांनी निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी माढा तालुक्यातील अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना या बैठकीसाठी बळावले होते. एकाबाजूला मोहिते जानकर हे कट्टर विरोधक एकत्र आल्याने भाजप चिंतेत असताना आज शिंदे आणि सावंत हे कट्टर विरोधक भाजपासाठी एकत्र आल्याने भाजपला थोडा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या