एक्स्प्लोर

Sanjay Shirsat: संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? खात्याच्या कारभारात दिरंगाई, भाजपची नाराज

Sanjay Shirsat: भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे.

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय विभागाची कामे उशिराने होतात. सोबतच, अनेक कामं सांगूनही केली जात नाहीत. भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे, त्यामुळे मंत्री संजय शिरसाट  (Sanjay Shirsat) यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

व्हायरल व्हिडीओमुळे शिरसाट अडचणीत

शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडीओ समोर काही दिवसांपूर्वी समोर आला होता. या व्हिडीओत दोन बॅगा दिसत होत्या. त्यापैकी एका बॅगेत नोटांची बंडलं असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला होता. हा व्हिडीओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरूनही ट्विट केलेला होता. हा व्हिडीओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय शिरसाटांनी मान्य केलं. पण पैशांची बॅग आपली असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला होता. प्रवास करून आल्यानंतरची ती कपड्यांची बॅग असल्याचं स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलं होतं. मुलगा सिद्धांतचे विवाहित महिलेसोबतचे संबंध, नंतर हॉटेल विट्सच्या लिलावातून त्यांना बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. आता बेडरुममधील पैशांच्या बॅगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

संजय शिरसाट कोणत्या प्रकरणांमुळे अडचणीत आलेत

1) शिरसाटांकडून संभाजीनगरातील वीट्स हॉटेलच्या खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. मुळात हॉटेलची किंमत 100 कोटी पेक्षा जास्त असताना शिरसाटांसाठी लिलावात किंमत कमी दाखवल्याचा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केला. कंपनी लिलावात सहभागी होण्यास पत्र नसल्याचाही दावा त्यांनी केला होता.

2) शेंद्रा एमआयडीसी मूळ जमिनीचा हेतू ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागा होती. मात्र आरक्षण बदलून संजय शिरसाट यांनी मुलाच्या नावे जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला.

3) छत्रपती संभाजीनगर शहरालगत वर्ग 2 ची जमीन नियमबाह्य खरेदी केल्याचा आरोप संजय शिरसाटांवर आहे. कोट्यवधीची जमीन कवडीमोल किमतीत घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप आहे.

4) शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवरील जमीन शिरसाटांनी अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

5) मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले. सिद्धांतने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. नंतर त्या महिलेने ते आरोप मागे घेतले. हे आमचं पर्सनल मॅटर असल्याचं तिने स्पष्टीकरण दिलं होतं.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा
मनोज जरांगे बिनडोक माणूस, तेली आणि ओबीसी समाज रस्तावर उतरणार, बावनकुळेंवरील टीकेनंतर भाजप नेत्याचा इशारा

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget