एक्स्प्लोर

Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?

Shivdeep Lande Bihar IPS: शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचा जावई आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार. शिवदीप लांडे हे आता बिहार विधानसभेची निवडणूक लढवतील, असे सांगितले जात आहे.

मुंबई: बिहारमध्ये आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिंघम अशी ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिहार पोलीस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी हा निर्णय घेतला होता. शिवदीप लांडे यांनी तडकाफडकी पोलीस दलातून राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण होते. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तसेच त्यांनी अचानक राजीनामा का दिला असावा, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवदीप लांडे हे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे. या कार्यक्रमात बिहारमधील अनेक निवृ्त्त पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करु शकतात. यामध्ये शिवदीप लांडे यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. शिवदीप लांडे यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2024) जनसुराज पक्षाच्या तिकीटावर पाटणा शहरातील एखाद्या मतदारसंघातून लढू शकतात. बिहारमध्ये शिवदीप लांडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच भांडवलाच्या जोरावर शिवदीप लांडे राजकीय आखड्यात उतरणार असल्याची चर्चा आहे. 

शिवदीप लांडे हे राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक होते. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारच्या जनमानसात प्रचंड लोकप्रिय आहेत. मध्यंतरी त्यांनी  मुंबईत अमली पदार्थ विरोधी कक्षातही काम केले होते. तेव्हाही  शिवदीप लांडे यांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते. राज्यात गाजलेल्या मनसुख हिरण हत्याप्रकरणाच्या तपासातही शिवदीप लांडे यांचा समावेश होता.

राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले होते?

प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्या या सगळ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानले आहे. माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून कोणतीची चुकभूल झाली असेल तर मी त्यासाठी क्षमस्व आहे. मी भारतीय पोलीस सेवेतून राजीनामा दिला आहे. मात्र, मी बिहारमध्येच (Bihar) राहणार आहे. यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल, असे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा

बारबालांना लपवण्यासाठी शौचालयात गुहा, IPS शिवदीप लांडेंची धडक कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Embed widget