एक्स्प्लोर

Nilesh Rane Ravindra Chavan Meet VIDEO: पैसे वाटपाचे आरोप, मालवणमधील प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं; निलेश राणे-रवींद्र चव्हाण समोरा-समोर येताच काय घडलं?

Nilesh Rane Ravindra Chavan Meet: निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये गेल्या काही दिवासांपासून तणाव निर्माण झाला होता.

Nilesh Rane Ravindra Chavan Meet: मालवण नगरपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटाचे (BJP vs Shivsena Shinde Group) आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यातील संघर्षाची राज्यभर चर्चा झाली. निलेश राणे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावर पैसे वाटपाचे थेट आरोप केले होते. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी देखील आरोप फेटाळत निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले. 

निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीमध्ये गेल्या काही दिवासांपासून तणाव निर्माण झाला होता. तसेच निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केल्यानंतर मंत्री आणि भाजपाचे नेते नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. या सगळ्या प्रकरणानंतर आज नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session Nagpur 2025) रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे (Nilesh Rane Ravindra Chavan Meet) पहिल्यांदाच समोरा-समोर आले. 

विधानभवन परिसरात निलेश राणे-रवींद्र चव्हाणांची भेट, काय घडलं? (Nilesh Rane Ravindra Chavan Meet)

रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी विधीमंडळ परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये गळाभेटही झाली. या भेटीनंतर माझं आणि रवींद्र चव्हाण यांचं काहीही वितुष्ट नाही. जे काही होतं ते निवडणुकीपुरतं होतं, अशी प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली. रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, असंही निलेश राणेंनी सांगितले. 

निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण, नेमकं प्रकरण काय? (Nilesh Rane vs Ravindra Chavan)

मालवणमधील नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 26 नोव्हेंबर मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन (Nilesh Rane Sting Opration Malvan) करत विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. विजय किनवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले. यानंतर निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही निलेश राणेंनी केला. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार आहे. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की, रविंद्र चव्हाण जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा वेगळं वातावरण निर्माण होतो. ते काल जिल्ह्यात आले. मला थोडा संशय आला की हे असेच सहज आलेले नाहीत, अशी टीकाही निलेश राणेंनी एबीपी माझाशी बोलताना केली. दरम्यान, बेकायदेशीरपणे घरात घुसल्याची तक्रार विजय केनवडेकर यांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित बातमी:

Maharashtra Winter Session Nagpur 2025: आजपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात; दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Kolhapur ZP and Panchayat Samiti Result: कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात पहिला गुलाल काँग्रेसला; सुरुवातीच्या कलांमध्ये कोल्हापूर झेडपी, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आघाडीवर; राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर
Solapur ZP election result 2026: सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Sharad Pawar: शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
शरद पवारांना गोविंद बागेत भेटण्यासाठी आलेल्यांना न भेटताच परतावे लागले; कारण...
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Ahilyanagar Crime News: तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
तू माझ्याशी का बोलत नाहीस? नंबर का ब्लॉक केला? एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर प्राणघातक हल्ला; अहिल्यानगर हादरलं!
Solapur : सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल: ZP च्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांवर कोणाची बाजी?
Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget