कृषीमंत्री धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान? परळी मतदारसंघातून या आमदाराच्या जावयाचं नाव उमेदवारीसाठी पुढं
परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राज साहेब देशमुख बबन गीते सुदामते गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
Beed: विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठवाड्यात परळी मतदारसंघात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आता नवं आव्हान उभं राहिल्याची चर्चा आहे. मुंडे भाऊ बहीण एक झाले आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं म्हणत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान राहणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राज साहेब देशमुख बबन गीते सुदामते गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळतात, आणि कुणाला उमेदवारी मिळते? हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.
आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई आज शरद पवार गटात
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आज मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत . रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत . लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे एकत्र आले . यानंतर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही महाविकास आघाडीचे साथ सोडत अजित पवार गटातून निवडणूक लढवली . आता याच कारणामुळे रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनीही रास आपला सोडचिठ्ठी दिली आहे .
लोकसभेत पंकजा मुंडे सोबत केला होता प्रचार
राजेभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष असून लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे यांच्या सोबत प्रचार केला होता मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात कायम काम करणार असल्याचे ते सांगतात .राजेभाऊ फड हे परळीतील आहेत. तसेच रासपाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत. राजाभाऊ फड हे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत..