एक्स्प्लोर

Supriya Sule : माझ्या लग्नात बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच सर्वाधिक केलं, सुप्रिया सुळेंनी किस्सा सांगितला!

Supriya Sule on Majha Maha Katta : माझ्या लग्नात बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच सर्वाधिक केलं, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे.

Sharad Pawar and Supriya Sule on Majha Maha Katta : माझ्या लग्नात बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच सर्वाधिक केलं, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा महाकट्टा' (Majha Maha katta) या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या. 

तुम्हाला जावयाकडून काय अपेक्षा होत्या?  लग्नाच्या प्रोसेसमध्ये शरद पवार होते का? असे विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या,  त्यांचा झिरो रोल होता. माझी आई आणि बाळासाहेब ठाकरेंचा जास्त रोल आहे माझ्या बाबांपेक्षा, असे त्यांनी म्हटले आहे.  

बाळासाहेब ठाकरे आणि माधव आपटे यांनी केलं सजेस्ट 

यावेळी शरद पवार म्हणाले की, प्रॅक्टीकली माझा त्यात काहीच रोल नव्हता. आमच्या काही जवळच्या मित्रांनी सजेस्ट केल. मग त्यात बाळासाहेब ठाकरे असतील किंवा माधव आपटे असतील. माधव आपटे म्हणजे उद्योजक. तर या दोघांनी हे सजेस्ट केल. त्याचे कारण कदाचित माझ्या जावयाचे वडील आणि ते मित्र होते. तुम्हाला वाटले होते का की आपल्या मुलीचे लग्न जमवावे लागेल की लग्न जमून येईल, अशी तुम्ही मनाची तयारी करून ठेवली असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, मित्रांनी सजेशन केले होते. मग हे दोघे भेटले आणि ठरवलं. साधारणतः जवळचे लोक सुचवतील तो जावई, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले. 

त्यांची इंटरेस्टची क्षेत्र वेगळी

तुम्ही नातवांना गाईड करतात, पवार कुटुंबापासून राजकारण वेगळे करणे कठीण आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांना तुम्ही कसे मार्गदर्शन करतात? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, इंटरेस्ट असला तरच तो विषय निघेल. बऱ्याचदा त्यांना या सगळ्या राजकीय गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. त्यांची इंटरेस्टची क्षेत्र वेगळी आहेत. 

माझे बाबा आणि आई फुल टाईम आजी-आजोबा

दिवाळीतील चार दिवस पवार कुटुंबीय बारामतीत जमतात. या काळात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. त्या सुप्रिया सुळे असतात का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की, सगळेच असतात. त्यात वर्गवारी आहे. यंगस्टर मुली साधारण चौदा, पंधरा, सोळा या वयातील त्यांचा एक ग्रुप वेगळा असतो. त्यांचे वेगळे जाणे, येणे, गप्पा-गोष्टी, त्यांचे वेगळे कार्यक्रम असतात. आम्ही सिनियर  जनरेशन आहे. ती नवीन काही करायचं का किंवा तुम्ही काही करताय का? कशात कांही सुधारणा करायची गरज आहे का? अशा विषयांवर चर्चा होत असते, असे त्यांनी म्हटले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझे बाबा आणि आई हे फुल टाईम आजी-आजोबा आहेत. मला माझ्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे माहित नसते पण त्यांना सर्व माहित असते. 

आणखी वाचा

मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget