एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : 'काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस, आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात'; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

Chandrashekhar Bawankule : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

चंद्राशेखर बावनकुळे म्हणाले की, मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या (BJP) संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही

भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. आज भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये चव्हाणांचे नाव असू शकते अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांना केली असता ते म्हणाले की, माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही.  मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमची विचारधारा स्वीकारत असतील तर त्यांचे स्वागत आहे.  काहीही बोलणे झाले नाही, माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही. 

राज्यसभेची तयारी करण्याची आम्हाला गरज नाही

आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील, सगळ्यांकडे आपली स्ट्रेंथ आहे, त्यांचे एक सीट सहज निवडून येईल.  कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होतो. प्रत्येकाची क्षमता आहे त्याचा फायदा होईल. मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा अनेक पक्ष प्रवेश होतील. मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, भाजपला बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नाही. अजूनही रोज भाजप पक्षात प्रवेश होत आहेत. राज्यसभेची तयारी करण्याची आम्हाला गरज नाही, असे बावनकुळे म्हणाले.   

पंकजा मुंडे आमच्या नेत्या

पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या गांव चलो अभियान या उपक्रमासाठी बीडच्या गावांमध्ये फिरत आहेत. या उपक्रमादरम्यान एका गावातील जाहीर कार्यक्रमात त्यांनी आपल्यासोबत दगाफटका झाला, मला राजकारणात वनवास झाला, असे म्हटले. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, माध्यमांनी पंकजा ताईंना फिरवून दाखवले. त्या विधान मंडळात नाही म्हणून त्यांनी सहज वक्तव्य केले. त्या आमच्या नेत्या आहेत. त्यांच्याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  

आणखी वाचा 

Ashok Chavan Resigns : 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 14 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Embed widget