![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे भाऊ म्हणून सौम्य कलमं लावण्यात आली, एमआयएमचा आरोप
Aimim on Raj Thackeray: औरंगाबाद येथे 1 मेला केलेल्या भाषणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे भाऊ म्हणून सौम्य कलमं लावण्यात आली, एमआयएमचा आरोप As he is the brother of the Chief Minister, mild offenses were filed against Raj Thackeray Allegations of MIM राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे भाऊ म्हणून सौम्य कलमं लावण्यात आली, एमआयएमचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/900fdba423a6e7d088221c851290a473_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aimim On Raj Thackeray: औरंगाबाद येथे 1 मे रोजी केलेल्या भाषणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याच दरम्यान एमआयएमने राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने त्यांच्यावर सौम्य कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
राणा दाम्पत्याला एक वागणूक आणि राज ठाकरे यांना वेगळी का?
याबाबत बोलताना एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील म्हणाले आहेत की, ''माझ्या मनात एक शंका येते, माझा भाऊ आहे म्हणून मी त्यावर कशाला देशद्रोहाची कलमे लावू. मी नवनीत रानावर लावू शकतो, मी दुसऱ्यांवर लावू शकतो, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल.'' ते म्हणाले, ''सर्व मोठ्या पक्षाची बैठक झाली, त्यात ठरवल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर ही कलमे लावण्यात आली आहे. राष्ट्रवादीला असं वाटलं असेल, पुढे त्यांना मनसे सोबत जाण्याची वेळ आली तर काय होणार, म्हणून त्यांच्यावर कडक सेक्शन लावू नये. आम्ही काहीतरी केलं, हे दाखवण्यासाठी सरकारने त्यांच्यावर ही सौम्य कलमं लावली आहेत. राणा दाम्पत्याला एक वागणूक आणि राज ठाकरे यांना वेगळी का, ज्या कलामांतर्गत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे, तीच कलमे राज ठाकरे यांच्यावर लावावीत, अशी मागणी त्यांनी सरकारला केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या 1 मे रोजीच्या भाषणात पुन्हा सरकारला अल्टिमेटम देत म्हटले आहे की, 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवले नाही तर 4 मेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील आदेश दिले आहे की, 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे वाजले, तर त्या मशिदीसमोर जोर-जोरात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करा. यावरूनच आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेक मनसे कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी 4 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नोटीस बजावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)