(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहूल गांधीच्या यात्रेत भारत तोडण्याची स्वप्ने पाहणारे तुकडे गँगचे सदस्य, अनुराग ठाकुर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Anurag Thakur On Bharat Jodo Yatra: कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. आज सकाळपासूनच भेटीगाठी आणि मिळावे घेत संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
Anurag Thakur On Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा करत फिरत आहेत, त्यांच्या यात्रेत भारताचे तुकडे करण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या तुकडे गँगचे लोकच दिसतात. जेएनयूए युनिव्हर्सिटीमध्ये भारताचे तुकडे करणारी पोस्टर चिकटवत भारत तेरे तुकडे होंगे हजार, अशा घोषणा देणाऱ्यांना भेटायला जाणाऱ्यांना राहुल गांधीचे भारत जोडो प्रेम बेगडी असल्याचा आरोप केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. याकूब मेमन यांच्या याच्या कबरीबाबत विरोधकांकडून भाजपला लक्ष करण्यात येत आहे. या प्रश्नाला बगल देत ठाकूर यांनी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेची खिल्ली उडवली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. आज सकाळपासूनच भेटीगाठी आणि मिळावे घेत संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
विरोधकांची अवस्था 'एक अनार सौ बिमार', अनुराग ठाकूर यांची टीका
भाजप विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत शरद पवार याचा पंतप्रधान करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना ठाकूर यांनी विरोधकांची अवस्था 'एक अनार सौ बिमार'अशी झाली असल्याचं म्हटलं आहे. बिहारमध्ये केसीआर आणि नितीश कुमार उठाबशा काढण्यात व्यस्त असल्याचां टोला त्यांनी लगावला. जिथे दोन लोक एकत्र येऊ शकत नाहीत, तिथे घटक पक्ष कसे एकत्र येतील, असा सवाल करत सर्वजण एकत्र आले तरी काही करू शकणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना संकटात जनतेला तारणाऱ्या जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या मोदी समोर कोणीही टिकू शकणार नाही. ते फक्त राजकीय तव्यावर पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.
कल्याण लोकसभेबाबतच्या चर्चांना पूर्णविराम
शत प्रतिशत भाजपाचा नारा देत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कल्याण लोकसभेचा दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या दौऱ्याची मागील काही दिवसात जोरदार चर्चा रंगली होती .खासदार श्रीकांत शिंदे हे या मतदार संघाचे खासदार आहेत. या मतदार संघात दौरा असल्याने या मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. आज सकाळी ठाकूर यांचे भाजप पदाधिकाऱ्यासह खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी स्वागत करत, या मतदार संघावर भाजपा दावा करत असल्याच्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.