एक्स्प्लोर

Video : विरोधकांनी मनोज जरांगे अन् श्याम मानव यांच्या रुपाने देवेंद्र फडणवीसांवर कुत्रे सोडले : भाजप खासदार अनिल बोंडे

Anil Bonde, यवतमाळ : "खोट नॅरेटीव्ह आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज पसरवणारा पसरवणारच आहे. फेक नॅरेटीव्ह फेक नॅरेटीव्ह करुन रडत बसण्यात अर्थ नाही."

Anil Bonde, यवतमाळ : "खोट नॅरेटीव्ह आपल्याला खोडणं आवश्यक आहे. गैरसमज पसरवणारा पसरवणारच आहे. फेक नॅरेटीव्ह फेक नॅरेटीव्ह करुन रडत बसण्यात अर्थ नाही. त्यांना खोट बोलण्याची सवय पडलीये ते खोट बोलणारच आहेत. आता ते एकटे खोट बोलणार नाहीत. त्यांनी आता अंगावर कुत्रे सोडले आहेत. एक श्याम मानवच्या रुपात सोडला की देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) वाईट-वाईट बोल. एक मनोज जरांगे (Manoj Jarange) सारखा सोडला", असे भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले. यवतमाळ मध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.

तोही 83 वर्षांचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता

अनिल बोंडे म्हणाले, मनोज जरांगेला मी विचारतो अरे बाबा मराठ्याच आरक्षण, मराठ्याच आरक्षण करतो. आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते? यशवंतराव चव्हाण होते,वसंतदादा पाटील,  शंकरराव चव्हाण होते. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण होते. ज्याच्या सांगण्यावर तू बोलतोय. तोही 83 वर्षांचा म्हातारा कधी ना कधी मुख्यमंत्री होता. तेव्हा शालिनीताई मराठ्याच आरक्षण मागत होत्या. तेव्हा काय झालं? शालिनीताई पाटलांच्या वेळेला मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं

पुढे बोलताना अनिल बोंडे म्हणाले, नरेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांचे वडिल आण्णासाहेब पाटील ते डिप्रेशनमध्ये गेले. शेवटी त्यांनी डोक्यात गोळी घालून शहिदत्व पत्करलं. मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावस वाटलं नाही. 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं. आपल्या विदर्भात मराठे 1 ते 2 टक्के आहेत. सगळे बाकीचे आहेत, ते कुणबी, तेली माळी आहेत. सुतार , कुंभार आहेत. बाकीचे सगळे आहेत. 252 जाती आहेत. तरिही देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. त्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. 

विरोधक सातत्यानं भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवीत असून त्यासाठी त्यांनी कुत्रे सोडले आहेत. त्यातला पहिला श्याम मानव तर दुसरा मनोज जरांगे आहे, अशी टीका भाजप चे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली. तर ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो 83 वर्षांचा म्हातारा हा मराठा समाजाचाच मुख्यमंत्री होता, अशीही टीका बोंडे यांनी  शरद पवार यांचे नाव न घेता केली. यवतमाळमध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देखील लावला नाही, असेही यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal on Baban Shinde : शरद पवारांच्या भेटीसाठी बबनदादांनी 'मोदी बाग' गाठली, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Embed widget