एक्स्प्लोर

Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव

Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे 41 हजार घनमीटर पाणी साठवण क्षमता असेल. यासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर प्रस्तावाबाबत भाजप आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेटही घेतली. 

विशेष म्हणजे, हाच मॉडेल हिंदमाता परिसरात तत्कालीन मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला होता. हिंदामातामधील पूरस्थिती कमी करण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांना यशस्वी प्रयोग मानले जाते. आदित्य ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवर टीका करणाऱ्या भाजपकडून आता त्याच सूत्राचा स्वीकार होत असल्याची चर्चा सुरु आहे. राजकारणात विरोध, पण अंधेरीसाठी आदित्य ठाकरेंचाच फॉर्म्युला, असे सध्यातरी दिसून येत आहे. दरम्यान, 2023 मध्ये 21, 2024 मध्ये 25 आणि 2025 मध्ये 22 वेळा अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला होता. (Andheri Subway Mumbai Rain)

पहिल्याच पावसात BMC ची पोलखोल- (Andheri Subway Mumbai Rain)

मुंबईत बुधवारी सकाळी झालेल्या पूर्व-मोसमी पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे बीएमसीच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बुधवारी सकाळी पश्चिम उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही भागांत जोरदार सरी कोसळल्याने अंधेरी सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 7.40 वाजता सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सबवे परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ बाजूलाच काढून ठेवल्याने एका सरीतच पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पहिल्याच पावसात मात्र नालेसफाईची पोलखोल समोर आली आहे. 

मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती- (Mumbai Rain)

पुढील काही तासांतच मान्सून (monsoon) केरळमध्ये दाखल होत असून महाराष्ट्रातही पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे, गेल्या चार महिन्यांपासून कडक ऊन आणि उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यंदा अल निनोचा प्रभाव असल्याने पाऊस काळ कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीदरम्यान मुंबईतील (Mumbai) अरबी समुद्रात (sea) तब्बल 24 वेळा मोठी भरती असणार आहे. मोठी भरती याचा अर्थ सदर भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

हवामान विभागाकडून समुद्रातील भरतीची तारीख आणि वेळ यासह भरती दरम्यान समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा दिनांक 16 जुलै 2026 रोजी उसळणार आहेत. मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जाणे टाळावे, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget