Amravati: अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; भाजप नेत्या नवनीत राणा आमदार रवी राणा विरोधात राजकीय आखाड्यात?
Amravati Politics : अमरावतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Amravati News : राज्यात सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असून त्या अनुषंगाने राजकीय (Maharashtra Politics) पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच अमरावतीच्या (Amravati Politics)राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाजप (BJP) त्या आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासोबत थेट राजकीय संघर्ष निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपसोबत युती करण्याचा ठराव संमत करूनही, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रवी राणा यांनी हा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'भाजपच्या नेत्या नवनीत राणा आता आमदार रवी राणा यांच्याविरोधात प्रचार करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे,' अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पती-पत्नी अमरावतीच्या राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधात (Ravi Rana vs Navneet Rana) प्रचार करताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
Ravi Rana vs Navneet Rana: नवनीत राणा आणि आमदार रवी राणा एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार?
दरम्यान, या संभाव्य परिस्थितीमुळे भाजप नेत्या नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. युवा स्वाभिमान पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे सांगितलं जातंय.कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार रवी राणा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. स्वबळाचा निर्णय एक दोन दिवसात आमदार रवी राणा हे स्वतः जाहीर करणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी युवा स्वाभिमान पार्टीची महाराष्ट्र कार्यकारिणी बैठक झाली. ज्यात भाजपसोबत युती करणार असा ठराव केला गेला होता. हे विशेष. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण करत भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी यांची युती न झाल्याने आता नवनीत राणा आणि आमदार रवी राणा एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार हे जवळपास निश्चित झालं.
महत्वाच्या बातम्या:
























