एक्स्प्लोर

उत्तम जानकरांनी इथून पुढे आपलं थोबाड आवरावं; आमदार अमोल मिटकारींचा थेट इशारा, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकरांना चांगलंचं फटकारलं आहे.

Amol Mitkari on Uttam Jankar: राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका, असं वक्तव्य उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी करत अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली आहे. अशातच अता उत्तम जानकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. बिबट्या म्हणून उत्तम जानकरांनी त्यांनी सिद्ध केलं की, अजित पवार वाघ आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसेच, थोबाड आवरावं असं म्हणत मिटकरींनी जानकरांना फटकारलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकरांना चांगलंचं फटकारलं आहे. तसेच, कडक शब्दांत 'थोबाड़ आवारावं' असा इशारा दिला आहे. दरम्यान, माळशिरसचे माजी आमदार हनुमंत डोळस यांनी उत्तम जानकर यांच्याविरुद्ध एक लक्षवेधी लावली होती. लक्षवेधीवर उत्तर देताना तात्कालीन धर्मदाय आयुक्तांनी कागदपत्र सादर केले. त्यावर तत्कालीन गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं होतं. म्हणजेच, हनुमंत डोळस यांनी उत्तम जानकरांना त्यांची जागा दाखवली आहे. आज तोच व्यक्ति अजित पवारांवर टिका करतोय, बिबट्या म्हणून त्यांनी सिद्ध केलं की अजित पवार हे वाघ आहेत."

काय म्हणाले उत्तम जानकर? 

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता. कोणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं. जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही 40 जणांना घेऊन पळून गेला होता. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित थेंब थेंब पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस पडल्यानं ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली.

आजही उत्तम जानकर हे अधिकृतपणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत असले तरी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादा यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत बारामतीमध्ये देखील जोरदार प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपनं याच जानकर यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी खास विमानाच्या वाऱ्या देखील घडवल्या. मात्र तरीही जानकर यांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत लोकसभेत राष्ट्रवादीच्या विजयात मोठा हातभार लावला होता. आता पुन्हा अजितदादा यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यावर अस्वस्थ झालेल्या जानकरांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा थेट अजितदादा यांच्यावर निशाणा साधला. त्यांना पक्षात घेतलं तर, प्रामाणिकपणे पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे संकेत उत्तम जानकरांनी दिले आहेत. त्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसादही दिल्याचं पाहायला मिळणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Shrikant Shinde : आपटे आणि कोतवालांचे श्रीकांत शिंदेंशी संबंध, संजय राऊतांचा दावाMumbai Superfast : मुंबई सुपरफास्ट : 20 सप्टेंबर 2024 :6 pm : ABP MajhaABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सShrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget