मोठी बातमी : राज-उद्धव युतीवर आता अमित ठाकरेंचं मोठं भाष्य, म्हणाले, दोघांकडे एकमेकांचा नबंर, फोन करावा
Uddhav Thackeray and Raj Thackeray alliance : दोन्ही पक्षाचे नेते काही दिवसांपूर्वी परदेशी दौऱ्यावर गेले आणि या युतीच्या चर्चा थंडावल्या. मात्र, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील युतीच्या चर्चेवरची भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray and Raj Thackeray alliance : राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena UBT) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या काही वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या. दोन्ही पक्षातील नेत्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मकता दर्शवली होती. दोन्ही पक्षाचे नेते काही दिवसांपूर्वी परदेशी दौऱ्यावर गेले आणि या युतीच्या चर्चा थंडावल्या. मात्र, आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे नेते अमित ठाकरे यांनी देखील युतीच्या चर्चेवरची भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?
मनसे शिवसेना युतीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची (राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे) इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं, आम्ही बोलून काही उपयोग नाही, असंही पुढे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मी या घडामोडीकडे लक्ष देत नाही. पण, राज ठाकरे आणि उद्धवजी बोलले तर होईल. आम्ही खालची लोक बोलून अर्थ नाही, मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही आहे. आम्ही याआधी संवाद साधला आहे, आता दोघांकडे फ़ोन आहे त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही 2014-17 मध्ये प्रस्ताव दिला होता, तेव्हा काय झाले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यावं. आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही, असंही पुढे अमित ठाकरे म्हणालेत.
काल अमित ठाकरे यांचं युतीबाबतचं सकारात्मक वक्तव्यसमोर आला होतं. त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी देखील युतीबाबत वक्तव्य केलं आहे. दोन्ही भावांनी एकमेकांशी याबाबत बोललं पाहिजे, असं आम्ही ठाकरे म्हणालेत. महानगरपालिका निवडणुकीच्या आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात एक वेगळं समीकरण पाहायला मिळेल. दोन भावांची इच्छा असेल तर त्या दोघांनी बोलावं एकमेकांना फोन करावा. माध्यमांसमोर बोलून काही फरक पडणार नाही आणि तशी युती देखील होत नाही, त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत. ते बोलू शकतात ते दोघे भाऊ आहेत असंही अमित ठाकरे म्हणाले आहेत.
संदिप देशपांडेंची प्रतिक्रिया
शिवसेना-मनसेच्या युतीच्या चर्चांबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, रोज-रोज आम्ही सकारात्मक आहोत, सकारात्मक आहोत, असे बोलून काय होत नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल, तेव्हा राज साहेब निर्णय घेतील. जो पर्यंत प्रस्ताव येत नाही, तो पर्यंत काही बोलता येत नाही. 2014 आणि 2017 ला आमची जीभ पोळलेली आहे. त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पित आहोत, असे त्यांनी म्हटले.























