माझ्यासोबत जे आले ते सर्व निवडूण आले, जे सोबत आले नाहीत त्यातील बहुतेकजण पडले : अजित पवार
माझ्यासोबत जे आले ते सर्व निवडूण आले आहेत. जे सोबत आले नाहीत त्यातील बहुतेकजण पडल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
Ajit Pawar : माझ्यासोबत जे आले ते सर्व निवडूण आले आहेत. जे सोबत आले नाहीत त्यातील बहुतेकजण पडल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. काळ बदलत असतो, वेळ बदलत असतो, नवीन पिढी समोर आली पाहिजे, तयार झाली पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.
लोकसभेला EVM चांगले होते का?
जालन्यात एका खासगी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते. काहीजण EVM ने हे दिवस दाखवले म्हणतात. मग लोकसभेला EVM चांगले होते का? असे म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला. आपल्या भारतात महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. त्यांना पुढे कधी पाठवायच कधी नाही हे कळतं असे अजित पवार म्हणाले. बारामती असं तसं तयार होत नाही, तर त्याला पहाटे 5 वाजून 6 वाजता कामाला लागावं लागतं असेही अजित पवार म्हणाले.
जालन्यातील प्रदुषणाबाबत मी पंकजा ताईंकडे सूचना करणार
जालन्यातील MIDC मधील प्रदूषणावर देखील अजित पवारांनी वक्तव्य केलं. त्यांना (कारखानदारांना ) पैसे कमवन्याकरता तुमचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कोणी दिला? प्रदुषण बोर्ड काय करतोय..? मी पंकजा ताईंकडे सूचना करणार आहे की त्यांच्यावर ॲक्शन घ्या असा इशारा अजित पवार यांनी दिला.
राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेणार
या राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी मी अर्थसंकल्पात काही महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले. ज्यांना गरज आहे, त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी राज्याला प्रगतीपथावर घेऊन जायचं आहे असंही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: