Ajit Pawar VIDEO: तुम्हाला एकूण मुलं किती आहे?; महिलेने सांगितले, तीन...; पुढे अजितदादा म्हणाले...
Ajit Pawar In Solapur: अजित पवारांनी सोलापूरमधील स्थलांतर करण्यात आलेल्या पूरग्रस्त लोकांसोबत संवाद साधला. यावेळी एक महिलेने तिचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

Ajit Pawar In Solapur: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सोलापूरमध्ये जाऊन विविध ठिकाणी पूरपरिस्थितीचा (Solapur Rain) पाहणी दौरा केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
अजित पवारांनी स्थलांतर करण्यात आलेल्या पूरग्रस्त लोकांसोबत संवाद साधला. यावेळी एक महिलेने तिचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अजित पवारांनी महिलेला तुमचा व्यवसाय काय?, असा प्रश्न विचारला. तसेच तुला मुलं किती?, असा सवालही अजित पवारांनी सदर महिलेला विचारला. यावर मला तीन मुलं असं महिलेने सांगितले. यानंतर काय मुलगा-मुलगी असे विचारले. यावर दोन मुली आणि एक मुलगा असे उत्तर दिले. अजित पवारांनी लगेच मुलगा कितवा झाला?, असा प्रश्न विचारला. यानंतर पहिले मुलगी, मग मुलगा आणि तिसरी पुन्हा मुलगी झाली, असं सदर महिलेने सांगितले. यानंतर अजित पवार हसले आणि जाऊ दे आता...असं म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनाही हसू अनावर झाले.
सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी- अजित पवार
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
आज सोलापूरच्या पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा करमाळा तालुक्यातील कोर्टी इथून सुरू केला. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच झालेल्या… pic.twitter.com/Y3cXOyZCHr
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 24, 2025
सोलापूरमधील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली-
सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (24 सप्टेंबर) सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरु केला आहे. काहीवेळापूर्वीच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या नुकसानीचा पाढा वाचला. तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा, अशी थेट मागणी केली.

























