एक्स्प्लोर

Ajit Pawar: कार्यकर्त्याने प्लॅस्टिकची पिशवी जमिनीवर फेकताच अजित पवारांनी खरडपट्टी काढली, म्हणाले, 'काय रे तुम्ही, वेड्याचा बाजार...'

Ajit Pawar: अजित पवार यांना कामात त्रुटी असलेली आवडत नाही. त्यांना एखादी गोष्ट खटकली की समोर कोणीही असू दे, ते मुलाहिजा न बाळगता त्याला खडे बोल सुनावतात.

Ajit Pawar in Wardha: आपल्या रोखठोक आणि शिस्तप्रिय वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामातील हयगय, निष्काळजीपणा आणि बेशिस्तपणा अजिबात खपवून घेत नाहीत. अनेकदा एखाद्या विकासकामाची पाहणी करताना कामात त्रुटी असेल तर अजित पवार (Ajit Pawar) वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही सर्वांदेखील सुनवायला मागेपुढे पाहत नाहीत. अजित पवार यांच्या याच वृत्तीचा अनुभव गुरुवारी वर्ध्यात आला. अजित पवार सध्या वर्ध्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी कचरा करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्याला चांगलेच झापले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wardha News)

अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले. याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अजित पवार हे गाडीतून खाली उतरताच राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना सांगितलं की, 'पाया पडू नका, मला पाया पडलेलं आवडत नाही.' या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणि हारतुरे (Garland) आणले होते. एका पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याला अजित पवारांना घालण्यासाठी हार मागितला. तेव्हा या कार्यकर्त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून (Plastic Bag) हार बाहेर काढला आणि ती पिशवी जमिनीवर फेकून दिली. ही गोष्ट अजित पवारांच्या नजरेत भरली आणि त्यांनी सर्वांदेखील या कार्यकर्त्याला चांगलेच झापले. असा कचरा करायचा, काय रे, तुम्ही वेड्याचा बाजार. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात, अशा शब्दांत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा चांगलाच उद्धार केला.

यानंतर अजित पवार हे स्वत: प्लॅस्टिकची पिशवी उचलायला खाली वाकले. मात्र, अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाने तात्काळ ती पिशवी उचलली. यानंतर अजित पवार हे कार्यकर्त्यांना सुनावत राहिले. 100 वेळा सांगतो पिशव्या टाकू नका, लोकं शिव्या देतात, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी निघून गेले. वर्धा जिल्ह्यातील या बैठकीला आमदार समीर कुणावार, राजेश बकाने उपस्थित होते. तर पालकमंत्री पंकज भोयर हे परदेश दौऱ्यावर असल्याने बैठकीला गैरहजर होते.

आणखी वाचा

Ajit Pawar on Rohit Pawar: माझ्या नादाला लागू नका! लय चुरूचुरू बोलू नको, भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास, अजितदादांचा रोहितदादाला हसत हसत दम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget