Ajit Pawar Clean Chit: अजित पवारांच्या 'कचाकचा बटण दाबा' वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट
Ajit Pawar Clean Chit: आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आलीय. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवण्यात आलीय.
![Ajit Pawar Clean Chit: अजित पवारांच्या 'कचाकचा बटण दाबा' वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट Ajit Pawar gets Clean Chit in Controversial Statement on EVM by Election Commission Marathi News Ajit Pawar Clean Chit: अजित पवारांच्या 'कचाकचा बटण दाबा' वक्तव्यावर निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/93ca7cf5c71f003c3febcd4f5644f45b171410445365989_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अजित पवारांना (Ajit Pawar) प्रचारसभेत विकासनिधीवरुन केलेल्या वक्तव्याबाबत क्लीन चिट घेण्यात आला आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचं नाव नव्हतं म्हणत क्लीनचीट देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली भाषणं चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्यं वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विरोधकांकडून देखील प्रचंड टीका करण्याात आली. त्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आलीय. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवण्यात आलीय.
काय म्हटले निवडणूक आयोगाने?
बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा , अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केल होत या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी कविता द्विवेदी यांच्याकडून करण्यात आली. प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही अस कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलय.
काय म्हणाले अजित पवार?
आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजेल तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे अजित पवार म्हणाले.
चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार:अजित पवार
अजित पवारांना विचारलं असता, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. बारामतीत मेळाव्यात अजित पवारांनी भाषणात म्हटलं की, येणाऱ्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द आहे. आचार संहिता नियम असतात पाळायचे असतात. ते ग्रामीण भाषेत बोललो, तेच पुण्यात असतो, तर तिथं कचा-कचा नाही चालत ज्या भाषेत चालतं तसेच बोलावं लागतं.
हे ही वाचा :
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)