एक्स्प्लोर

अजित पवारांकडून लोकसभेच्या 4 जागा जाहीर, ठाकरे गटाच्या जागाही लढवण्याची इच्छा, एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

Ajit Pawar on Lok Sabha Seats : "मार्च 2024 मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा माझा अंदाज आहे. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार आहोत", असं अजित पवार म्हणाले.

कर्जत, रायगड : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Lok Sabha Election) यांनी लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election 2024) मोठी घोषणा केली आहे. "मार्च 2024 मध्ये पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होतील, असा माझा अंदाज आहे. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार आहोत", असं अजित पवार म्हणाले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस (Karjat NCP Shibhir) अजित पवार गटाचे शिबीर सुरु आहे. या शिबिरात अजित पवारांनी ही घोषणा केली. 

"आपल्याकडे असणाऱ्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणार आहोतच. परंतु इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला  जागा वाटप करता येईल" असं अजित पवार म्हणाले

चारही जागी राष्ट्रवादीचा खासदार

दरम्यान, अजित पवार यांनी ज्या चार जागा लढवण्याची घोषणा केली आहे, त्या चारही जागी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. यामधील तीन ठिकाणी शरद पवार गटाचे तर एक ठिकाणी अजित पवार गटाचा खासदार आहे. बारामतीत सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे आणि साताऱ्यात श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे खासदार आहेत. तर रायगड लोकसभेत सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे खासदार आहेत. या चारही जागा अजित पवार गट लढवणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. 

जागा वाटपाबाबत सर्वांशी चर्चा करु

लोकसभेच्या जागावाटपाबाबत आम्ही सर्व मिळून चर्चा करुन ठरवू. आम्ही अमित शाह साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील आमची थोडीशी प्राथमिक चर्चा झाली. परंतु  या पाच राज्यांच्या सध्या निवडणुका चालू आहेत. त्याच्यानंतर आपण बसूया अशा पद्धतीने आम्हा लोकांचं ठरलेलं आहे. त्याच्यात इलेक्टिव्ह मेरिट पाहू, त्या त्या भागामध्ये त्या त्या कार्यकर्त्याचं काम पाहून, आपण आपली सगळी ताकद NDA च्या मागे लावू. सगळे घटक पक्षांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत या लोकसभेच्या निवडणुकीचा काम करायचे आहे, असं अजित पवार म्हणाले. 

अजित पवार काय म्हणाले? 

या शिबिराला अनेकांना यायचं होतं. कार्यकर्ते जे पक्षाच्या करता काम करतोय, आम्ही जिवाचं रान करतोय असं ज्यांना वाटतं, त्यांना शिबिराला यावं वाटणं साहजिक आहे. पण जागेची मर्यादा पाहून प्रत्येकाला येता आलं नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातल्या माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या मुंबईतल्या सहकाऱ्यांना यायचं होतं. आमची पण इच्छा होती शेवटी कार्यकर्ते असले तर संघटना मजबूत होत असते. कार्यकर्ता संघटनेचा कणा असतो. त्याच्यामुळे संघटना वाढत असते. 

पुढे आपल्याला दिवस कमीच आहेत. कारण माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही, माझा अंदाज आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मागचा जर रेकॉर्ड बघितला 2014, 2019, 2009, 2004 तर साधारण त्या काळामध्ये निवडणुका लागल्या होत्या.

उद्याच्या सात तारखेपासून आपलं हिवाळी अधिवेशन आहे नागपूरला. पुरवणी मागणी आम्ही सादर करून सभागृहात  त्या मंजूर करुन घेऊ. आपल्याला NDA ला पूर्ण ताकद लावायची आहे. NDA च्या विचाराच्या लोकांना  तिसऱ्यांदा त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावे ही आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे.  कशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना काम करायचं,आपल्या विचारांचे सरकार निवडून आणायचं आहे, त्याकरता माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहित सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त करावी लागणार आहे. 

VIDEO :  अजित पवारांची घोषणा, लोकसभेच्या या 4 जागा लढवणार

संबंधित बातम्या 

मोठी बातमी! महायुतीतल्या बारामती, सातारा, रायगड, शिरूरच्या जागा अजित पवार गट लढवणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
Embed widget