मोदी दर्ग्यावर चादर चढवतात आणि मुलीचा हिजाब काढतात, अकोल्यात असदुद्दीन ओवैसीचं टीकास्त्र
Asaduddin Owaisi on PM Modi : मोदी दर्ग्यावर चादर चढवतात आणि मुलीचा हिजाब काढतात, असा टोला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला.
Asaduddin Owaisi on PM Modi : मोदी दर्ग्यावर चादर चढवतात आणि मुलीचा हिजाब काढतात, असा टोला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi ) यांनी लगावला. ते अकोल्यात बोलत होते. यावेली ओवेसी यांनी भाजप (BJP) आणि काँग्रेसवरही (Congress) हल्लाबोल केला. 600 वर्षांपूर्वीच्या मस्जिदीला शहीद केलं. भाजपला काय करायचं हे तुम्ही पाहताहात. आज देश अत्यंत वाईट परिस्थितीतून जातोय. देशात मुस्लिम आणि दलितांनी एकत्र येणं आवश्यक आहे. माझ्या सभेला लोक गर्दी करतात. मतदान करीत नाहीत. आज भारतातील मुस्लिमांची परिस्थिती हिटलरच्या काळातील ज्यूंसारखी झाली आहे, असं ओवेसी म्हणाले.
काँग्रेस नेत्यावर भडकले -
अकोल्यातील सभेत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांवर जहरी टीका केलीय. अकोल्यातील गडंकी भागातल्या झुल्फीकार मैदानावर काल रात्री त्यांची सभा झालीय. एमआयएमला भाजपची 'बी टीम' म्हणणारे अशोक चव्हाणच आज मोदींसोबत चहा पीत असल्याची टीका त्यांनी केली. तर मध्यप्रदेशचे काँग्रेसचे कमलनाथही आज भाजपच्या वाटेवर असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तर, इकडे मोदींविरोधात बोलणारे अजित पवार आता त्यांच्याच मांडीवर बसल्याचा टोला त्यांनी लगावलाय. सोबतच आता तेच बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करीत असल्याचा खोचक टोला खासदार औवेसींनी लगावलाय.
वचिंतच्या बालेकिल्ल्यात असदुद्दीन ओवेसी ंची सभा -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात रविवारी रात्री 'एम.आय.एम 'ची पहिली सभा झाली. ओवेसी यांची ही सभा झालीय त्यांचा कधीकाळचा मित्रपक्ष असलेल्या वंचितच्या बालेकिल्ल्यात. तेही प्रकाश आंबेडकर अकोल्यात असताना. अकोल्यातील गडंकी भागातल्या झुल्फिकारबाबा मैदानावर झालेली सभा गाजली, त्यातील भाषणांपेक्षा गोंधळ अन रेटारेटीमूळे. कार्यकर्ते आणि लोकांच्या बेशिस्तीने सभेत खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांना अनेकदा मध्यातच थांबावं लागलंय. या सभेत नेत्यांना राग अनावर झाला.
खासदार असदुद्दीन ओवेसींच्या सभेत गोंधळ -
सभा संपल्यानंतर खासदार असदुद्दीन ओवेसी अन इम्तियाज जलील व्यासपीठावरून खाली येताना झालेली रेटारेटी अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. सुदैवाने, विजेचा मनोरा कोसळून कोणती दुर्घटना घडली नाही. खासदार ओवेसी ंच्या सुरक्षेचे तर यात पार तीनतेरा वाजले. सभेची वेळ सहाची. दुसरे वक्ते असलेले खासदार इम्तियाज जलील व्यासपीठावर आले 7.45 वाजता. तोपर्यत मुख्य वक्ते ओवेसी ंचा तर कुठेच पत्ता नव्हताय. मैदान मारू पाहणार्या जलिल यांचा गर्दीनं हिरमोड केलाय. त्यांना अनेकदा रागवावं लागलंय. अन पारा भडकलेल्या जलील यांनी थेट समजेल अशा भाषेत सांगितलंय. लोकांच्या अतिउत्साहाने सभा फ्लॉप होते की काय अशातच ओवेसी ंची एंट्री झाली ती 9 वाजून 10 मिनिटांनी. मात्र, बेशिस्त पाहून त्या़नीही भाषण थांबवलं. मात्र, दिवसभर किशनगंज, बागडोग्रा, नवी दिल्ली, छत्रपती संभाजीनगर ते अकोला असा दिवसभरातील प्रवासाचा लांबपल्ला गाठलेल्या ओवेसी ंच्या भाषणाची गाडी अखेर 'ट्रॅक'वर आली.
आणखी वाचा :