एक्स्प्लोर

Ahmednagar Lok Sabha: EVM मशीन्स ठेवलेल्या अहमदनगरच्या स्ट्राँग रुममध्ये अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरीचा प्रयत्न, निलेश लंकेंकडून व्हीडिओ ट्विट

Maharashtra Politics: मतदान झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशिन्स एका स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जातात. आता या सर्व ईव्हीएम 4 जूनला निकालाच्या दिवशी बाहेर काढल्या जातील. तोपर्यंत स्टाँग रुमवर कडेकोट पहारा

अहमदनगर: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पार पडल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जवळपास दररोज काही ना काही समस्या समोर आणल्या जात आहेत. यामध्ये ईव्हीएम यंत्रांच्या (EVM Machines) सुरक्षेविषयी विरोधकांकडून वारंवार सवाल उपस्थित केले जात आहेत. यामध्ये आता शरद पवार गटाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची भर पडली आहे. निलेश लंके यांनी एक व्हीडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

निलेश लंके यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, अशी टीका निलेश लंके यांनी केली आहे.

बारामतीच्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याने वाद

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता. तब्बल अर्धा तास हे सीसीटीव्ही फुटेज दिसत नव्हते. त्यामुळे रोहित पवार आणि शरद पवार  गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, काहीवेळानंतर हे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा मॉनिटरवर दिसू लागले होते. मात्र, या अर्धा तासात कोणीही स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम यंत्रांशी छेडछाड करु शकतो, असा आरोप विरोधकांनी केला होता. अखेर याविषयी स्पष्टीकरण देताना निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली नव्हती. केवळ सीसीटीव्ही फुटेज दाखवणारा मॉनिटर बंद पडला होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या वादावर पडदा पडला होता. परंतु, आता नगरमधील घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा

ठाण्यात ईव्हीएम सापडले; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा खुलासा

पुढील 35 दिवस पोलिसांचा डोळ्यात तेल घालून पाहारा; ईव्हीएम स्ट्राँगरुमसाठी राबतेय सुसज्ज यंत्रणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget