एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्षपद? चर्चांना पूर्णविराम देत आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

Aaditya Thackeray : आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  (Aaditya Thackeray) यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून (Shivsena) मोठी जबाबदारी दिली जाण्याची चर्चा आज (बुधवारी, ता १५) माध्यमांसह राजकीय वर्तुळात सुरू होती. सुरू असलेल्या चर्चेनुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची (Working President) धुरा दिली जाणार होती. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती, मात्र या सर्व चर्चेवरती आता खुद्द आदित्य ठाकरेंनीच पडदा टाकला आहे. (Maharashtra Politics)

Aaditya Thackeray :  बातमीत काहीही तथ्य नाही आणि 

आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत याबाबतच्या चर्चा नाकारल्या आहेत. त्यांनी याबाबत म्हटलंय की, "आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.🚨 कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! 🚨". त्यांना पक्षात कार्याध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्ये होत्या, त्यावर आदित्य ठाकरेंनी पोस्ट करत पडदा टाकला आहे.

Aaditya Thackeray :  नेमकी काय होती चर्चा?

 आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे. आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढणार असून त्यांच्याकडे  मोठ्याप्रमाणावर अधिकार येतील, असे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)

2003 साली ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती, अगदी तशाचप्रकारे आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यासाठी शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलवून तसा रितसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो. 

Aaditya Thackeray :  या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल त्याचे स्वागत केले पाहिजे. नक्कीच आता, तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढलं राजकारण तरुणांच्या हातात गेले पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल खासगीत नेते काय बोलता, याला अर्थ नसतो. मुंबई महानगरापलिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी आणि त्यांच्या टीमने उत्तम काम केले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Ladki Bahin Yojana : 9605 कोटींचा हिशोब कोण देणार? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
9605 कोटींचा हिशोब कोण देणार? अपात्र लाभार्थ्यांना निधी वितरण कसं झालं? दोषींवर कारवाई करा: जयंत पाटील
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget