एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मोठी बातमी : आम्ही मनोज जरांगेंसोबत, आम आदमी पक्ष विधानसभा स्वबळावर लढणार, मुंबईच्या 36 जागांवर शड्डू ठोकला

Aam Aadmi Party on Maharashtra Vidhansabha Election : "आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत."

Aam Aadmi Party on Maharashtra Vidhansabha Election : "आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आहे. आम आदमी पार्टी या शतकातील सर्वात यशस्वी  राजकीय पक्ष आहे. फक्त 2012 मध्ये स्थापन झालेल्या राजकीय पक्षाने आतापर्यंत दोन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मुंबईतील ३६ जागा लढण्याची तयारी आम्ही केली आहे", असं आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा म्हणाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. 

महाराष्ट्रात जे वंचित आहेत जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे

प्रीती शर्मा म्हणाल्या,  महाराष्ट्राला राज ठाकरे यांची गरज आहे का? राज ठाकरे कधी नायक होतात कधी खलनायक होतात ते एक चांगले ऍक्टर आहेत. आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्रात जे वंचित आहेत जे मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. अनेक ठिकाणी आमचे आमदार आहेत, अनेक ग्रामपंचायती पासून अनेक ठिकाणी आमचे सदस्य आहेत. इतक्या वेगाने जर कोणी पुढे जात असेल तर त्यांना मागे खेचण्याचं काम नेहमी होतं. कोर्टाने सांगितलं की या प्रकरणात आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काहीही सापडत नाही म्हणून आम्ही त्यांना जामीन देत आहोत. पण आपलं गृहखात हे आपल्या यंत्रणांचा चुकीचा वापर करून कसं आहे ते त्यांनी चांगलं जाणलं आहे. मग सीबीआय ने सुद्धा अटक केली. पुन्हा आम्ही तोच लढा पुन्हा सुरू करत आहोत. इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती, असंही प्रीती शर्मा यांनी नमूद केलं. 

लेक्ट्रोल बाँड घोटाळ्यात स्पष्ट दिसत आहेत की ज्यांनी हा घोटाळा केला ते बीजेपी सोबत 

पुढे बोलताना प्रीती शर्मा म्हणाल्या, इलेक्ट्रोल बाँड घोटाळ्यात स्पष्ट दिसत आहेत की ज्यांनी हा घोटाळा केला ते बीजेपी सोबत आहेत. ज्यांनी आरोप केले अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी भाजपला इलेक्ट्रॉनिक बाँड मार्फत करोडो रुपये दिले आहेत. आम आदमी पार्टी देशात सर्वात जलद गतीने वाढणारा राजकीय पक्ष आहे. सामाजिक कल्याण हे एकमेव आमचं कामाचं मूल्य आहे. लोकांना आरोग्य, शिक्षण, पाणी या सर्व सुविधा लोकांना देणं आमचं काम आहे. याच जोरावर आम्ही पंजाब मध्ये सरकार स्थापन केलं. भाजपाला वारंवार हरवून आम्ही भाजपसोबत  पंगा घेतला आहे. भाजपमध्ये एवढी भीती आहे की त्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवल्या आहेत.

आम आदमी पार्टीची मुंबईमध्ये निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी होती. आम्ही लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. बीकेसीमध्ये जी इंडिया आघाडीची सभा होती त्यामध्ये आम आदमी पार्टीच्या जास्त ताकद दिसली. लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि प्रचार केला. आम्ही प्रामाणिकपणे इंडिया आघाडी सोबत काम केले. मुंबईतील इंडिया आघाडीच्या सर्व खासदार उमेदवारांचा आम्ही प्रचार केला. मुंबईत आम आदमी पार्टीला जास्त पसंती आहे, असंही प्रीती शर्मा यांनी सांगितलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Prakash Ambedkar on Manoj Jarange : मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस, प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून शा‍ब्दिक हल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiiya Shole : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोपTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Shivsena Shinde Camp: नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
नंतरला अंतर म्हणून पहिल्याच विस्तारात मंत्रीपद मिळवण्यासाठी लॉबिंग, शिंदे गटाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Embed widget