एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास, अफवांवर विश्वास ठेवू नका; आदित्य ठाकरे काय म्हणाले? 

Aaditya Thackeray On Operation Tiger : गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी आमच्या खासदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

पुणे : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगरची (Operation Tiger) चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे खासदार आमच्यासोबत आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले. लोक अंधभक्त असतात, पण आम्ही आमच्या सहकाऱ्यांवर अंधविश्वास ठेवतो, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असल्याने त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

आमच्यासोबत जे लोक आहेत त्यांना 2024 च्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. संसदेत दोन तृतियांश बहुमत हवं असल्याने भाजपकडून देशभर तोडफोड सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Uddhav Thackeray Shivsena Meeting : उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना आज ना उद्या पश्चाताप होणार असं उद्धव ठाकरे ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीत म्हटल्याची माहिती आहे. 2002 च्या ऐतिहासिक उभ्या फुटीनंतर जवळपास चार वर्षांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याची चर्चा आहे.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी चाचपणीसाठी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला नऊ पैकी पाच खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचं आहे त्यांना जबरदस्तीनं हात धरुन थांबवण्यात काय अर्थ असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

शिवसेनेचा 60 व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या हालचाली शिंदेंकडून सुरू असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या शक्यतेनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी ऑपरेशन टायगर राबवलं जाऊ शकतं. पण यात एक कायदेशीर अडचण आल्यानं सध्यातरी हे ऑपरेशन आकड्यांच्या गणितात अडकल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पडणार की ठाकरे सावरणार हे पाहावं लागेल.

खासदारांच्या बैठकीच्या निमित्तानं ठाकरेंची पहिली लिटमस टेस्ट पार पडली. या बैठकीला नऊ पैकी पाच खासदार अनुपस्थित होते. आता 19 तारखेला शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांची दुसरी लिटमस टेस्ट पार पडणार आहे. त्या कार्यक्रमाला किती खासदार उपस्थित राहतात, यावरून भविष्यात काय घडणार हे दिसेल.

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget