UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. मात्र, आग्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदावाराची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या उमेदवारानं चक्क 98 वेळा निवडणूक हरल्या आहेत. असं असलं तरी चक्क 100 निवडणुका लढवण्याचा या उमेदवाराचा मानस आहे. 


हसनुराम आंबेडकर अंस उमेदवाराचं नाव आहे. बहुजन समाज पक्ष अस्तित्वात येण्यापूर्वी, हसनुराम आंबेडकर हे कांशीराम यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज असोसिएशनचे (BAMCEF) ज्येष्ठ सदस्य होते. हसनुराम आंबेडकर यांनी 1985 पासून लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुकांसह अनेक संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या जागांवरून लढवल्या आहेत. तरीही त्यांना आजपर्यंत एकही विजय मिळाला नाही. एवढेच नाही तर 1988 मध्ये त्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारीही केली होती, तरीही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता.


"मी हरण्यासाठी निवडणूक लढतो. जिंकणारे नेते जनतेला विसरतात. मला 100 वेळा निवडणुका हरण्याचा विक्रम करायचा आहे. मला माझे विरोधक कोण आहेत? याची पर्वा नाही. कारण, माझा आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास आहे. मतदारांना पर्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवतो. खेरागड मतदारसंघ मधून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी बुधवारी माझा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आलाय. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आग्रा (ग्रामीण) मतदारसंघातूनही मी उमेदवारी अर्ज भरावा अशी माझी आंबेडकरी जनतेची इच्छा आहे. त्यासाठी आजच मी उमेदवारी अर्ज करेल", हसनुराम आंबेडकर म्हणाले आहेत.


याआधी 2021 मध्ये हसनुराम आंबेडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत उतरले होते. मात्र, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच वेळी, आग्रा आणि फतेहपूर सिक्री या जागांवरून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. पण आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. निवडणुकीत त्यांना सर्वाधिक मते 1989 च्या लोकसभा निवडणुकीत मिळाली होती. त्यावेळी त्यांना 36,000 मतं मिळाली होती.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha