Omicron : भारताकोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग सामुदायिक प्रसाराच्या (Community Transmission Stage) टप्प्यात पोहोचला आहे. अनेक महानगरांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतानाच पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या परिस्थितीवर INSACOG ने बुलेटिन प्रसिद्ध केले आहे.  INSACOG ने या बुलेटिनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जगात ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा उपप्रकार आढळून आल्याचं या बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं आहे. ओमायक्रॉन BA.2 हा, ओमायक्रॉनचे संसर्गजन्य उपप्रकारही आढळला आहे.


INSACOG ने म्हटले आहे की, आतापर्यंत बहुतेक ओमायक्रॉन संसर्गाची प्रकरणे लक्षणे नसलेली किंवा सौम्य असल्याची होती. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकार धोक्याची पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार आता भारतात सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यात आहे. अनेक महानगरांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिर वाढत आहेत. त्यातही ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा संसर्गाचा धोका भारतात मोठ्या प्रमाणात आहे. 


ओमायक्रॉन बी2 मध्ये अनुवांशिक भिन्नता आहे. नुकत्याच नोंदवलेल्या ओमायक्रॉन BA.2 (B.1.640.2) प्रकाराचे निरीक्षण केले जात आहे. यामध्ये जलद संसर्गाचा कोणताही पुरावा नाही. दरम्यान, या प्रकारामध्ये रोगप्रतिकारक शक्तीपासून बचावाची वैशिष्ट्ये असली तरी, सध्या हा चिंतेचा प्रकार नाही. आतापर्यंत, भारतात ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असं INSACOG ने म्हटले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha