Beating Retreat : देशात राष्ट्रपिता महामा गांधींवरून (Mahatma Gandhi) पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. नव्या वादाचे कारण एक धून असून, त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पलटवार सुरू झाला आहे. प्रजासत्ताक दिना (Republic Day) नंतर 'बिटिंग द रिट्रीट' (Beating Retreat) हा कार्यक्रम असतो, ज्यातून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता होते. 29 जानेवारीला होणारा हा सोहळा सध्या वादात सापडला असून या वादाचे कारण एक धून आहे. ही धून आहे 'अबाईड विथ मी' (Abide With Me).
या धूनवरून देशात राजकीय खळबळ माजली आहे. बीटिंग द रिट्रीट कार्यक्रमात ही धून तुम्हाला यावेळी ऐकायला मिळणार नाही. ही धून महात्मा गांधींची आवडती धून असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा वारसा भाजप जाणीवपूर्वक पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.
काँग्रेसचा भाजपवर आरोप
काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी ट्विट केले की, "सध्या गांधीजींचे अनुयायी आणि त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांच्यात वैचारिक युद्ध सुरू आहे. सध्याचे केंद्र सरकार गोडसेंच्या विचारांवर चालणार आहे. गांधीजींबद्दल टीका करणाऱ्यांवर ती कोणतीही कारवाई करत नाही.''
काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी ट्विट केले की, ''यावेळच्या बीटिंग रिट्रीट कार्यक्रमामधून महात्मा गांधींचे आवडते गाणे काढून टाकण्यात आले आहे. बापूंचा वारसा पुसून टाकण्याचा भाजप सरकारचा हा आणखी एक प्रयत्न आहे. गांधीजींविरोधात वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे भाजपचे गोडसेवरचे प्रेम आहे. म्हणजेच सुरांची लढाई आता विचारधारेवर आली आहे.''
भाजपचं काँग्रेसला उत्तर
भाजपने काँग्रेसच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. 'अबाइड विथ मी' ऐवजी 'सारे जहाँ अच्छा' धून ही बिटिंग द रिट्रीटच्या कार्यक्रमात सूचीबद्ध करण्यात आल्याचे भाजप सरकारचे आहे. ''काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासंदर्भात यावेळी बरेच बदल केले जात आहेत'', असं भाजपने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Subhash Chandra Bose : सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात 'नेताजीं'चा मोलाचा वाटा
- Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद
- Digital India : सर्व सरकारी योजनांसाठी एकच डिजिटल प्रोफाईल, ऑगस्टपासून सुरू होणार ‘सिंगल साईन ऑन’ पोर्टल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha