Mansukh Mandaviya: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अत्यावश्यक औषधांची सुधारित राष्ट्रीय यादी (NLEM) प्रसिद्ध केली आहे. अत्यावश्यक औषधांच्या नवीन यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात आयव्हरमेक्टिन, मुपिरोसिन आणि निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यांसारख्या विशिष्ट संसर्गविरोधी औषधांचा समावेश आहे. त्यामुळे या यादीतील औषधांची एकूण संख्या आता 384 झाली आहे. यासोबतच सरकारने अत्यावश्यक यादीतून 26 औषधे काढून टाकली आहेत. याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, सरकार सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार औषध उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. एखाद्याच्या औषधाच्या किमतीत होणारी वाढ थांबवण्याची व्यवस्था केली जात आहे. ते म्हणाले की, या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही औषधाची किंमत संबंधित कंपनी स्वतःहून किंवा स्वेच्छेने वाढवू शकत नाही.


ते पुढे म्हणाले की, यादीत समाविष्ट असलेल्या सर्व औषधांची किंमत नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीद्वारे निश्चित केली जाणार. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व औषधांच्या किमती घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे निश्चित केल्या जातील. प्राधिकरण या औषधांची कमाल किंमत निश्चित करेल. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व औषधांच्या किमती लवकरच सुधारित केल्या जातील. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. प्रवीण पवार आणि मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


या यादीत 34 नवीन औषधे समाविष्ट करण्यात आली असून 26 काढून टाकण्यात आली आहेत. तसेच कोविडच्या कोणत्याही औषधाचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. कारण याची चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यांचा समावेश आपत्कालीन वापरात करण्यात आला आहे. यातच ज्या 26 औषधांना या यादीतून काढण्यात आले आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहे. 


1. स्टावूडीन (ए) + लॅमिवुडीन (बी)
2. लॅमिवुडिन (ए) + नेविरापीन (बी) + स्टावूडीन (सी)
3. ब्लीचिंग पाउडर
4. कनामायसीन
5. सेट्रिमाइड
6. रॅनिटिडीन
7. लेफ्लुनोमाइड
8. डिमेरकाप्रोलो
9. एरिथ्रोमायसीन
10. एथिनील एस्ट्राडीयोल
11. एथिनिल एस्ट्राडियोल (ए) नोरेथिस्टरोन (बी)
12. गॅनिक्लोवीर
13. कॅप्रोमायसीन
14. अॅटेनोलोल
15. दिलोक्सॅनाइड फ्यूरोएट
16. मेथिल्डोपा
17. निकोटिनामाइड
18. पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2ए, पेगीलेटेड इंटरफेरॉन अल्फा 2बी
19. पेंटामिडाइन
20. प्रिलोकेन (ए) + लिग्नोकेन (बी)
21. प्रोकार्बाजिन
22. क्लोरफेनिरामाइन
23. रिफाब्यूटिन
24. अल्टेप्लेस
25. सुक्रालफेट
26. पेट्रोलेटम


इतर महत्वाच्या बातम्या :


Gaganyaan Spaceflight Mission : गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज, मानवाला अंतराळात पाठवण्याचे भारताचे स्वप्न पूर्ण होणार 
Arvind Kejriwal Attack on BJP: सोनिया गांधींना मागील दरवाजाने भाजप पंतप्रधान करणार! असं केजरीवाल यांनी का म्हटले?