Aditya Thackeray: शिवसेनेने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की, ''वेदांता व फॉक्सकॉनने आपला प्रकल्प महाराष्ट्रात उभारा असण्याचे जाहीर केले होते. याबाबत आम्ही वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी महाराष्ट्रात येणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड देखील केली होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे कळल्यानंतर मला धक्का बसला आहे.''


आदित्य ठाकरे म्हणाले की, अनिल अग्रवाल यांचे ट्वीट पाहून धक्का बसला. कारण आम्ही दोघेही (सुभाष देसाई ) या कंपनीसोबत चर्चा करत होतो. याबाबतच आमची 21 जानेवारी 2022 रोजीही यावरून चर्चा झाली. फॉक्सकॉनच्या  सेमीकंडक्टर प्रकल्पबद्दल आमची ही चर्चा होती. यानंतर आम्ही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जागा देखील पाहिल्या. नंतर त्यांच्या टीमने तळेगावची निवड केली. ते म्हणाले, यात महत्वाचं म्हणजे हा उद्योग पावणेदोन लाख कोटी रुपयांचा आहे. यात 160 लहान उद्योग देखील सोबत येणार होते. यामुळे 70 हजार ते 1 लाख रोजगार निर्मिती होणार होती. हे सर्व होत असताना, आता हा उद्योग गुजरातला जात असल्याची बातमी आमच्या कानावर आली.


हे सरकार खोके सरकार आहे: आदित्य ठाकरे 


आदित्य ठाकरे म्हणाले की, 95 टक्के सर्व व्यवस्थित पार पडले होते. 100 टक्के सायनिंगनंतर ठरणार होतं. सर्व ठरल्यानंतर ही कंपनी महाराष्ट्रातून बाहेर का गेली. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ट्वीट करताना अग्रवाल यांनी हे देखील ट्वीट केलं आहे की, तेथील उद्योग मंत्र्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने जी मेहनत घेतली, ती आताच्या काळात खूप चांगली होती. मग आपले उद्योग मंत्री आपलं सरकार, जे खोके सरकार आहे. मी या सरकारला सरकार मनात नाही. कारण हे घटनाबाह्य सरकार आहे. या सरकारमध्येही ही जी काय व्यवस्था आहे. ते काय करत होते. 


'जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं'


आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''एकंदरीत आता परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? हा मोठा प्रश्न पडला आहे. मग यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो की, कोण कुठे गोळीबार करत असतो हा, या सर्व गोष्टी पाहता किती गुंतवणूकदार आपल्या राज्यात येणार.'' यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके. बाजीगर चित्रपटात होतं की, हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. यांचं जीत के हारने वाले को खोके सरकार कहते हैं, असं ते झाले आहेत. 


आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदमधील महत्वाचे मुद्दे: 



  • वेदांता व फॉक्सकॉनने महाराष्ट्रात येण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या टीमने तळेगावची निवड केली होती. 

  • या प्रकल्पामुळे पावणेदोन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. 

  • यातून 70 हजार ते 1 लाख रोजगार निर्मिती होणार होती. 

  • जूनपर्यंत ही कंपनी इथंच येणार होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. 

  • लोकांचा व गुंतवणूकदारांचा विश्वास आमच्या सरकारवर होता. पण तो विश्वास या सरकारवर राहिला नाही.

  • एका महिन्यात काय बिघडले व काय कमी केले, ज्यामुळं हा उद्योग गुजरातला गेला.   


संबंधित बातमी: 


Semi Conductor Project : महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण