Gaganyaan Spaceflight Mission : मानवाला अंतराळात पाठवण्याचे भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण गगनयान पहिल्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना यांनी याबाबत माहिती दिली. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारने 2022 या वर्षासाठी मानवी अंतराळ उड्डाणाची (Gaganyaan Spaceflight Mission ) योजना आखली होती. परंतु, कोरोना महामारीमुळे या मोहिमेच्या वेळापत्रकात बदल झाला. परंतु, लवकरच भारताचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मंत्री सिंह यांनी म्हटले आहे. 


गगनयानची पहिली चाचणी या वर्षाच्या शेवटी होणार आहे. पहिल्या चाचणी उड्डाणानंतर अंतराळातील व्योम मित्रा हा ह्युमनॉइड रोबोट पुढील वर्षी बाह्य अवकाशात पाठवला जाईल, अशी माहिती सिंह यांनी दिली. भारतीय हवाई दलाने मानवयुक्त अंतराळ उड्डाण मोहिमेसाठी संभाव्य चालक म्हणून चार लढाऊ वैमानिकांची निवड केली होती. या वैमानिकांनी रशियामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) दोन कक्षीय चाचणी उड्डाणांच्या परिणामांचे मूल्यांकन केल्यानंतर 2024 मध्ये दोन अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवले जाईल, अशी माहिती मंत्री सिंह यांनी दिलीय. 


चाचणी मोहिमेदरम्यान अंतराळयान 15 किमी उंचीवर प्रक्षेपित केले जाईल. त्यावेळी शास्त्रज्ञ पॅराशूट वापरून क्रू कॅप्सूल पृथ्वीवर परत येण्याची खात्री करण्यासाठी परिस्थितीची पाहणी करतील. अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दहा हजार कोटी रूपयांच्या या अंतराळ मोहिमेची घोषणा केली होती.  


महत्वच्या बातम्या


Arvind Kejriwal Attack on BJP: सोनिया गांधींना मागील दरवाजाने भाजप पंतप्रधान करणार! असं केजरीवाल यांनी का म्हटले? 


Secunderabad Fire : सिकंदराबादमध्ये अग्नितांडव, इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना शोरुममध्ये आग, आठ मृत्युमुखी