एक्स्प्लोर

गणपत गायकवाडांनीही बजावला हक्क, 274 आमदारांचं मतदान पूर्ण; विधानपरिषदेसाठी निकालाचं काऊंटडाऊन सुरू

विधानपरिषदेसाठी विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी, सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकानंतर पहिलीच मोठी निवडणूक होत असून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळपासूनच मतदान सुरू झालं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असून कोणाची विकेट निघणार याबाबत गुरुवारी तर्कवितर्क लढविले जात होते. आपापली मते फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी क्रॉसव्होटिंग होण्याची आणि धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये, शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या विजयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घेतली असून आपल्या आमदारांची गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच खातरदारी केल्याचं पाहायला मिळालं आहे.  

विधानपरिषदेसाठी विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी, सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेसाठी एकूण 274 आमदारांचं मतदान होणार असून दुपारी 3 वाजता सर्वच 274 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सध्या तुरुंगात असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावता येणार की नाही, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगानेही त्यांना मतदान करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सर्वात शेवटी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मतमोजणीची परवानगी मागितली जाईल, त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

दुपारी दीड वाजेपर्यंत 274 आमदारांचं मतदान 

महायुतीचं मतदान

भाजप आणि अपक्ष मिळून - 108 आमदार मतदान झाले
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 आणि दोन अपक्ष अशा एकूण 42 आमदार यांनी मतदान केलं
शिवसेना शिंदे गटाचे एकूण 38 आमदार असून त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांचे 2 अशा 9 आमदारांचं समर्थन असल्यानं त्यांचे संख्याबळ 47 होते. शिंदेंच्याही सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झालं आहे. दरम्यान, मनसेचे राजु पाटील व बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांचे दुपारनंतरही बाकी होते, अखेर राजू पाटील व बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. 

महाविकास आघाडीचं मतदान

काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी आज मतदान केले. त्यानंतर काँग्रेस आमदार कैलास गोरांट्याल यांची शायरी
रातभर दिल की धडकने जारी रहती है
सोते नहीं है हम
जिम्मेदारी रहती है
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सर्व आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क आहे
शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सर्व आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. 

हे आहेत रिंगणात

भाजप: पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
शिंदेसेना: भावना गवळी, कृपाल तुमाने
अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे
काँग्रेस: प्रज्ञा सातव
उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील

मतांची समीकरणे कशी?

भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात.

शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे 39 आमदार असून त्यांना 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.

शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे 15 आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे 16 मते आहेत. त्यांना आणखी 7 मतांची जुळवाजुळव करावी लागेल.

अजित पवार गटाचे 39 आमदार आहेत. त्यांना आणखी 7 मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. तर, उद्धवसेनेकडे 15 आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते हवी आहेत. 

काँग्रेसची मते निर्णायक

काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे 37 मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ 23 मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे 14 मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.

काँग्रेसचे 4 जण क्रॉस व्होटिंग करतील

काँग्रेसमधील तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील, असे भाकीत उमेदवार व शेकाप नेते जयंत पाटील यांनी वर्तविले. हे आमदार कोण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत, मनाने काँग्रेससोबत नाहीत, असेही पाटील म्हणाले.

महायुतीला पराभव दिसत असल्याने ते काँग्रेसची मते फुटणार, अशी अफवा पसरवत आहेत. तसे अजिबात होणार नाही. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांना लगावला टोला
देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, संजय राऊतांनां लगावला टोला
Thane District Central Co-Operative Bank Ltd Election 2026: ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-चव्हणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय 
ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-चव्हणांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा; महायुतीचा दणदणीत विजय 
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget