एक्स्प्लोर

पैसे मागितल्याच्या रागातून नाशिकमध्ये पोलिसाकडून बार मॅनेजरला मारहाण

काही वेळा कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच कायदा हातात घेतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या लेखानगरमधील एका बारमध्ये पोलिसानं बार मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतात. मात्र काही वेळा कायद्याचे रक्षक असलेले पोलिसच कायदा हातात घेतात. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.  नाशिकच्या लेखानगरमधील एका बारमध्ये पोलिसानं बार मॅनेजरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दारु आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या रागातून मारहाण केल्याचा आरोप पोलिसावर करण्यात आला आहे. बारमध्ये मारहाण करताना पोलिसानं एका सराईत गुन्हेगाराची मदत घेतल्याचंही बोललं जातं आहे. 29 जानेवारीला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुकटात दारूची बाटली न दिल्याने चक्क पोलिस कर्मचाऱ्याने एका गुंडाच्या साथीने बार मॅनेजरला मारहाण केल्याची ही घटना समोर आली आहे. 29 जानेवारीला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिकच्या लेखानगर परिसरातील एका बारमध्ये पोलिस कर्मचारी भगवान जाधव हा एका सराईत गुंडासोबत या बारमध्ये आला आणि त्याने दारूसह पाण्याची बाटली खरेदी केली. बारच्या मॅनेजरने पैसे मागताच जाधवने त्याला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता तू धंदाच कसा करतो ते बघतो अशी दमदाटी देखील केल्याची तक्रार संबंधित मॅनेजरने अंबड पोलिसांकडे केली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार घडून देखील पोलीस कर्मचारी आणि त्याचा साथीदार अद्याप फरार असून वरिष्ठ अधिकारी भगवान जाधवला पाठिशी घालताय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जाधव हा पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. एकीकडे शहरात गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढलं असताना आता पोलिसच गुंडगिरी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget